सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी.

June 29th, 08:00 am

सेशेल्सचे राष्ट्रपती महामहीम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. सेशेल्समधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधानांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट.

June 28th, 08:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिक्टोरिया, माहे येथे मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. पंतप्रधान रामगुलाम यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पदभार स्विकारल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली ही चौथी भेट आहे.

पंतप्रधानांची सेशेल्सला अधिकृत भेट

June 28th, 08:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 27 ते 29 जून 2026 या कालावधीतील सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून, आज व्हिक्टोरिया, माहे येथील 'स्टेट हाऊस'मध्ये आयोजित बैठकीत पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यात अधिकृत चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा समावेश होता. आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी, डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास, सामाजिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, सागरी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली; यामध्ये बेकायदेशीर मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी आणि समुद्री चाचेगिरी यांसह हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने या मुदद्यांचाही समावेश होता. भारताने जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत विविध प्रकल्प आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांचा सेशेल्स दौरा : फलनिष्पत्तीची यादी

June 28th, 08:17 pm

सेशेल्स सरकारला एक जलदगती गस्ती नौका भेट म्हणून देणे

पंतप्रधान मोदी यांचे सेशेल्समध्ये उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

June 27th, 03:30 pm

पंतप्रधान मोदींचे सेशल्समध्ये आगमन झाले असून विमानतळावर राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी पारंपारिक नृत्याचे एक विशेष सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले. हा दौरा भारत-सेशल्समधील जवळचे आणि जुने संबंध अधोरेखित करतो, ज्यामध्ये विविध क्षेत्रांतील सहकार्य मजबूत करण्यावर भर असेल. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी सेशल्सच्या नेतृत्वासोबत चर्चा करतील.

पंतप्रधानांचे 27 ते 29 जून 2026 दरम्यानच्या सेशेल्स दौऱ्यावर प्रस्थान करण्यापूर्वीचे निवेदन

June 27th, 08:25 am

सेशेल्स प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून, सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होण्यासाठी मी, 27 ते 29 जून 2026 या कालावधीत सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे.

पंतप्रधानांचा सेशेल्सचा राजकीय दौरा (27 ते 29 जून, 2026)

June 25th, 06:05 pm

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून, भारताच्या 'महासागर' संकल्पनेला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी 27-29 जून 2026 दरम्यान सेशेल्सचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला 'प्रमुख पाहुणे' म्हणून उपस्थित राहणार असून राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्याशी चर्चा करतील. तसेच, ते सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला (संसदेला) संबोधित करतील आणि तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.

India – Seychelles Joint Vision for Sustainability, Economic Growth and Security through Enhanced Linkages

February 09th, 03:28 pm

At the invitation of Prime Minister Narendra Modi, the President of the Republic of Seychelles Dr. Patrick Herminie is on a State Visit to India. During their meeting on 9 February 2026, PM Modi and President Herminie had comprehensive and productive discussions covering the entire spectrum of bilateral relations. The two leaders reaffirmed Seychelles' role as an important pillar in India's MAHASAGAR Vision and announced a Joint Vision for SESEL.

Seychelles is an integral part of India’s MAHASAGAR Vision: PM Modi at the India and Seychelles joint press meet

February 09th, 01:00 pm

While addressing the joint press meet with Seychelles President Patrick Herminie, PM Modi said that Seychelles is an integral part of India’s MAHASAGAR Vision. He announced a Special Economic Package of 175 million dollars for Seychelles and discussed further strengthening ties across multiple sectors. Both sides issued the India–Seychelles Joint Vision, which will serve as a roadmap for cooperation in the coming years.

पंतप्रधानांनी डॉ पॅट्रिक हेर्मिनी यांचे सेशेल्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले

October 12th, 09:13 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पॅट्रिक हेर्मिनी यांचे सेशेल्समधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

भारत-सेशेल्स उच्चस्तरीय दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या (8 एप्रिल, 2021) कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

April 08th, 04:48 pm

आरंभी, मी राष्ट्राध्यक्ष रामकलावान जी यांना हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो. ते भारताचे सुपुत्र असून, बिहारमधील गोपालगंज येथे त्यांची मुळे रुजलेली आहेत. आज त्यांच्या परसौनी या गावातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाला त्यांचा यशाचा अभिमान वाटतो आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून झालेली त्यांची निवड त्यांच्या सार्वजनिक सेवेप्रति समर्पणावर सेशेल्सच्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास सिद्ध करते.

भारत-सेशल्स उच्च स्तरीय व्हर्च्युअल कार्यक्रम (8 एप्रिल 2021)

April 07th, 06:02 pm

सेशेल्स येथे विविध भारतीय प्रकल्पांच्या उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल 2021 रोजी सेशल्सच्या राष्ट्रपतींसमवेत उच्च स्तरीय आभासी कार्यक्रमात सहभागी होतील.

सोशल मीडिया कॉर्नर 25 जून 2018

June 25th, 07:23 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सेशेल्सच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशेल्स यांच्यातील स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य करारांची यादी

June 25th, 03:26 pm

सेशेल्सच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशेल्स यांच्यातील स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य करारांची यादी

सेशेल्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे निवेदन

June 25th, 01:40 pm

राष्ट्रपती फॉर आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. वर्ष 2015 मधला माझा सेशेल्सचा दौरा, जो हिंदी महासागर क्षेत्रातला माझा पहिला दौरा होता, त्याच्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत. त्याच वेळी तत्कालीन राष्ट्रपती जेम्स मिशेल यांनी भारत दौरा केला होता.

PM's meetings on the sidelines of CHOGM18 in London

April 19th, 08:45 pm

Prime Minister Narendra Modi held bilateral level talks with leaders of several nations in the sidelines of Commonwealth Heads of Government Meeting 2018 in London.

PM's bilateral meetings on the sidelines of International Solar Alliance Founding Conference

March 11th, 05:08 pm

PM Narendra Modi today held bilateral level talks with several heads of states on the sidelines of the International Solar Alliance Founding Conference in New Delhi. He met leaders from Abu Dhabi, Sri Lanka, Bangladesh, Seychelles, Comoros and several other countries.

सेशेल्स संसदीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले

August 10th, 06:05 pm

12 सदस्यीय सेशेल्स संसदीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांच्या विधिमंडळातील वाढत्या देवाणघेवाणीचे स्वागत केले. दोन्ही देशातल्या दृढ संबंधांचे सशक्तीकरण करण्यात त्यांच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

PM’s Statement to the Media with President Michel of Seychelles

August 26th, 01:45 pm



PM greets the people of Seychelles on their National Day

June 18th, 11:17 am