भारत सिंगापूर संयुक्त निवेदन
September 04th, 08:04 pm
सिंगापूरचे पंतप्रधान मा. लॉरेन्स वाँग यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने, भारत आणि सिंगापूर यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारीसाठीच्या कार्ययोजना (रोडमॅप) विषयक संयुक्त निवेदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन
September 04th, 12:45 pm
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान वोंग यांच्या पहिल्या भारत भेटीचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ही भेट आणखी खास आहे कारण यावर्षी आम्ही द्विपक्षीय संबंधांचा साठावा वर्धापनदिन साजरा करत आहोत.पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद
September 03rd, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान सेमीकंडक्टर जगातील प्रमुख सीईओंशी संवाद साधला. मी या क्षेत्रातील भारताच्या अथक सुधारणा प्रवासाबद्दल सांगितले ज्यामध्ये मजबूत पायाभूत सुविधांची निर्मिती आणि कौशल्यासह नवोन्मेषावर भर देणे समाविष्ट आहे, असे मोदी म्हणाले.दिल्लीमध्ये यशोभूमी इथे सेमिकॉन इंडिया 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 02nd, 10:40 am
केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जी,ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी जी, केंद्रीय राज्य मंत्री जितिन प्रसाद जी, सेमीचे अध्यक्ष अजित मनोचा जी,देश-विदेशातून आलेले सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी,विविध देशांतले इथे उपस्थित आमचे अतिथी, स्टार्ट अपशी संबंधित उद्योजक,विविध भागांमधून आलेले माझे युवा विद्यार्थी मित्र, उपस्थित स्त्री-पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सेमिकॉन इंडिया 2025 चे उद्घाटन
September 02nd, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित 'सेमिकॉन इंडिया - 2025' चे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतातील आणि परदेशातील सेमीकंडक्टर उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीची दखल घेतली. त्यांनी विविध देशांमधील प्रतिष्ठित पाहुणे, स्टार्ट-अपशी संबंधित उद्योजक आणि देशातील विविध राज्यांमधून आलेल्या युवा विद्यार्थ्यांचे स्वागत केले.पंतप्रधानांच्या हस्ते 2 सप्टेंबरला नवी दिल्लीतील यशोभूमी येथे ‘सेमिकॉन इंडिया - 2025’ चे होणार उद्घाटन
September 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील यशोभूमी इथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित ‘सेमिकॉन इंडिया - 2025’ चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून या परिषदेत सहभागी होतील. यात ते सीईओ गोलमेज बैठकीतही भाग घेतील. 2 ते 4 सप्टेंबर या तीन दिवसांच्या परिषदेत भारतात मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाईल. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमातील प्रगती, सेमीकंडक्टर फॅब आणि प्रगत पॅकेजिंग प्रकल्प, पायाभूत सुविधांची तयारी, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील नवे शोध, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरणांची अंमलबजावणी यासारख्या विषयांवर सत्रे आयोजित केली जातील. याशिवाय, डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेअंतर्गत उपक्रम, स्टार्टअप परिसंस्थेची वाढ, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भविष्यातला आराखडा यावरही प्रकाश टाकला जाईल. या परिषदेत 20,750 हून अधिक सहभागी उपस्थित राहतील, यामध्ये 48 हून अधिक देशांमधले 2,500 हून अधिक प्रतिनिधी, 50 हून अधिक जागतिक नेत्यांसह 150 हून अधिक वक्ते आणि 350 हून अधिक प्रदर्शकांचा समावेश आहे. याशिवाय, 6 देशांच्या गोलमेज चर्चा, देशांची पॅव्हिलियन्स, तसेच कामगार विकास आणि स्टार्टअप्ससाठी समर्पित विशेष पॅव्हिलियन्स यांचाही समावेश असेल. सेमीकंडक्टर क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आणि विविध देशांच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला बळकट करण्याच्या धोरणांचा जास्तीत जास्त प्रचार करणे हे जागतिक स्तरावर आयोजित सेमिकॉन परिषदांचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांच्या भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि तंत्रज्ञान विकासाचे केंद्र म्हणून प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, 2022 मध्ये बेंगळुरू, 2023 मध्ये गांधीनगर आणि 2024 मध्ये ग्रेटर नोएडा येथे अशा परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या.