अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 22nd, 11:36 am
हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
September 22nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी डोनयी पोलो यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे सर्वांना आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली.राजस्थानमधील बिकानेर येथे विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 22nd, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीयुत भजन लाल जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, अर्जुन राम मेघवाल जी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी जी, प्रेमचंद जी, राजस्थान सरकारमधील अन्य मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी मदन राठौर जी, अन्य खासदार आणि आमदारगण, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले
May 22nd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे स्वागत केले आणि 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ऑनलाईनरित्या लक्षणीय संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे कौतुक केले. त्यांनी अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले. देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.