India - Oman Joint Statement during the visit of Prime Minister of India, Shri Narendra Modi to Oman
December 18th, 05:28 pm
Prime Minister Narendra Modi visited Oman from 17–18 December 2025 at the invitation of Sultan Haitham bin Tarik, marking 70 years of diplomatic ties. The visit strengthened the India Oman strategic partnership with the signing of CEPA, key MoUs and adoption of a Joint Vision on Maritime Cooperation.Joint Statement on the visit of PM Modi to the Hashemite Kingdom of Jordan
December 16th, 03:56 pm
At the invitation of HM King Abdullah II, PM Modi visited Jordan on December 15-16, 2025. Both the leaders positively assessed the multi-faceted India-Jordan relations that span across various areas of cooperation including political, economic, defence, security, culture and education among others. They also appreciated the excellent cooperation between the two sides at the bilateral level and in multilateral forums.Prime Minister Pays Tribute to the Martyrs of the 2001 Parliament Attack
December 13th, 11:46 am
In line with his commitment to the security forces, PM Modi today paid solemn tribute to the brave security personnel who sacrificed their lives while defending the Parliament of India during the heinous terrorist attack on 13 December 2001. He noted that their courage, alertness, and unwavering sense of responsibility continue to serve as an enduring inspiration for every citizen.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
December 11th, 08:43 pm
जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेणार आहेत; तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या दृष्टीकोनाची देवाणघेवाण करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अनुषंगाने भारत-जॉर्डन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणे आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीची वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल.पंतप्रधानांनी एका संस्कृत श्लोकाद्वारे ज्ञान, संयम आणि समयोचित कृती हे राष्ट्रीय शक्तीचे आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले आहे.
December 11th, 10:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि भारताच्या दीर्घकालीन सुरक्षा आणि विकास उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी धोरणात्मक शहाणपण, संयम आणि निर्णायक कृती यांचे शाश्वत मूल्य अधोरेखित केले आहे.फलनिष्पत्तींची यादीः रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भारत भेट
December 05th, 05:53 pm
एका देशाच्या नागरिकांच्या दुसऱ्या देशाच्या भूभागातील तात्पुरत्या कामगार कामकाजासाठी भारत सरकार आणि रशियाचे सरकार यांच्यातील करारJoint Statement following the 23rd India - Russia Annual Summit
December 05th, 05:43 pm
At the invitation of PM Modi, Russian President Putin paid a State Visit to India for the 23rd India–Russia Annual Summit. The Leaders positively assessed the multifaceted and mutually beneficial India–Russia relations that span all areas of cooperation. As this year marks the 25th anniversary of the Declaration on Strategic Partnership between India and Russia, the two Leaders reaffirmed their support for further strengthening the Special and Privileged Strategic Partnership.पंतप्रधानांनी रायपूर येथील 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/ महानिरीक्षकांच्या परिषदेचे भूषवले अध्यक्षपद
November 30th, 05:17 pm
पंतप्रधानांनी पोलिसांच्या प्रति असलेली लोकांची धारणा बदलण्याची तातडीची गरज व्यक्त केली. विशेषतः युवकांमध्ये व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि प्रतिसादक्षमता वाढवून हे साध्य करण्याचे त्यांनी सुचवले. त्यांनी शहरी पोलिसिंग मजबूत करणे, पर्यटन पोलिस व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे आणि वसाहतवादी कालखंडातील फौजदारी कायद्यांची जागा घेणाऱ्या नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यासंबंधी सार्वजनिक जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित केली.जोहान्सबर्ग येथील जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट
November 23rd, 09:46 pm
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 23rd, 09:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
November 21st, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. 2020 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत संबंध वाढल्यानंतर गेल्या पाच वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य वाढत असल्याबद्दल तसेच सहकार्यात येणाऱ्या विविधतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबत एकजुटता व्यक्त केली. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.नवी दिल्लीत सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधानांचे भाषण
November 17th, 08:30 pm
आज आपण सर्वजण अशा एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत, ज्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोकचळवळीच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथजी यांनी एक दूरदर्शी म्हणून, एक संस्था निर्माते म्हणून, एक राष्ट्रवादी म्हणून आणि एक माध्यम अग्रणी म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र नाही, तर एक मिशन म्हणून भारतातील लोकांसमोर स्थापित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह, भारताची लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. म्हणूनच 21 व्या शतकातील या कालखंडात जेव्हा भारत विकसित होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे, तेव्हा रामनाथजी यांची बांधिलकी, त्यांचे प्रयत्न, त्यांची दूरदृष्टी आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानतो, त्यांनी मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केले, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमध्ये मांडले आपले विचार
November 17th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत द इंडियन एक्सप्रेसने आयोजित केलेल्या सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. मोदी म्हणाले की, आज आपण अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्यांनी भारतातील लोकशाही, पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोक चळवळींच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथ गोएंका यांनी एक दूरदर्शी, संस्था निर्माते, राष्ट्रवादी आणि माध्यम नेते म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून भारतातील लोकांमध्ये स्थापित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारताच्या लोकशाही मूल्यांचा आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. 21 व्या शतकाच्या या युगात, भारत विकसित होण्याच्या संकल्पाने पुढे जात असताना, रामनाथ गोएंका यांची वचनबद्धता, प्रयत्न आणि दूरदृष्टी खूप मोठी प्रेरणा स्रोत आहे यावर त्यांनी भर दिला. हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानले आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन केले.वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 07th, 10:00 am
वंदे मातरम, हे शब्द एक मंत्र आहेत,एक उर्जा आहे,एक स्वप्न आहे,एक संकल्प आहे.वंदे मातरम,हे शब्द भारत मातेची साधना आहेत,भारत मातेची आराधना आहे. वंदे मातरम हे शब्द आपल्याला इतिहासात घेऊन जातात.आपल्या आत्मविश्वासाला,आपल्या वर्तमानाला आत्मविश्वासाचे बळ देतात आणि आपल्या भविष्याला नवी उमेद देतात की असा कोणताही संकल्प नाही, असा कोणताही संकल्प नाही जो साध्य होऊ शकत नाही.असे कोणतेही लक्ष्य नाही जे आपण भारतवासीय साध्य करू शकत नाही.“वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
November 07th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ शब्द नव्हेत – हा एक मंत्र आहे, एक उर्जा, एक स्वप्न आणि एक पवित्र निश्चय आहे. वंदे मातरम् हे भारतमातेप्रति भक्ती आणि आध्यात्मिक समर्पण यांचे मूर्त रूप आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा एक शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो, आपला वर्तमानकाळ आत्मविश्वासाने भरून टाकतो आणि आपल्या भविष्यकाळाला असा धीर देण्यासाठी प्रेरित करतो की, कोणताही निश्चय पूर्ण होणार नाही असा नसतो आणि कोणतेही ध्येय आपल्या आवाक्याबाहेर नसते.नवा रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 01st, 01:30 pm
छत्तीसगडचे राज्यपाल रमण डेका जी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी, छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष- माझे मित्र रमण सिंह जी, राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मंत्री तोखन साहू, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, अरूण साव, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते चरणदास महंत आणि उपस्थित इतर मंत्री, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित भगिनी आणि सद्गृहस्थ हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे केले छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
November 01st, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये नवा रायपूर येथे छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आजचा दिवस छत्तीसगडच्या विकासाच्या वाटचालीची सोनेरी सुरुवात आहे, असे नमूद केले. आपल्या स्वतःसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक दशकांपासून जोपासना केलेल्या या भूमीसोबत आपले अतिशय दृढ भावनिक नाते असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याच्या काळाची आठवण करून देत मोदी म्हणाले की छत्तीसगडमध्ये त्यांनी बराच काळ व्यतित केला आणि तिथून बरेच काही शिकायला मिळाले. छत्तीसगडबाबतचा दृष्टीकोन, त्याच्या निर्मितीचा संकल्प आणि या संकल्पाची पूर्तता यांची आठवण करून देत, छत्तीसगडच्या परिवर्तनाच्या प्रत्येक क्षणाचे आपण साक्षीदार राहिलो असल्याचे सांगितले. हे राज्य आपल्या 25 वर्षांच्या वाटचालीतील एका महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत असताना, या प्रसंगाचा एक भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने या राज्याच्या जनतेसाठी विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी छत्तीसगडच्या जनतेला आणि राज्य सरकारला या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधान सानई ताकाईची यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधला
October 29th, 01:14 pm
पंतप्रधान सानई ताकाईची यांनी पदभार ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 16th, 03:00 pm
आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण
October 16th, 02:30 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.