नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

December 18th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सुतार जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. श्री राम सुतार जी हे एक असामान्य शिल्पकार होते. त्यांच्या शिल्पकलेमधील कुशलतेमुळेच केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशाचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या काही कलाकृती भारताला लाभल्या. भारताचा इतिहास, संस्कृती आणि एकजुटीच्या भावनेची सामर्थ्यशाली अभिव्यक्ती असलेल्या कलाकृती म्हणून त्यांच्या कलाकृतींची नेहमीच प्रशंसा होत राहील आणि या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी भावी पिढ्यासांठी राष्ट्रीय अभिमान अजरामर केला आहे. त्यांच्या कलाकृती कलाकार आणि नागरिक या दोघांनाही नेहमीच प्रेरणा देत राहतील.