रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
September 01st, 01:24 pm
आपल्याला भेटून अत्यंत आनंद झाला. आपली भेट हा एक संस्मरणीय क्षण असतो असे मला नेहमी वाटत आले आहे. या भेटीत अनेक गोष्टींच्या माहितीचे परस्परांमध्ये देवाण-घेवाण करण्याची संधी मिळते.पंतप्रधानांनी घेतली रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भेट
September 01st, 01:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली.रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणणण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
September 01st, 12:48 pm
चीनमधील तिआनजिन येथे आयोजित SCO शिखर परिषदेच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, यावेळी झालेल्या चर्चेत युक्रेन संघर्ष हा विषय केंद्रस्थानी होता. शांततेच्या दृष्टीने अलीकडे सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी स्वागत करत सर्व बाजू रचनात्मकरीत्या पुढे येतील अशी आशाही व्यक्त केली. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची तसेच कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय शोधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मोठ्या प्रमाणात मानवी पैलूवर भर देऊन हा केवळ प्रादेशिक मुद्दा नसून मानवतेने दिलेली हाक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.25 व्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 01st, 10:14 am
25 व्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होताना मला आनंद होत आहे. शानदार स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी राष्ट्रपती शी यांचे मनापासून आभार मानतो.चीनमधील तियानजिन येथील पंचविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 01st, 10:00 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभाग झाले आहेत. या शिखर परिषदेत एससीओचे विकासविषयक धोरण, जागतिक प्रशासनात करण्याच्या सुधारणा, दहशतवाद विरोधी धोरण, शांतता आणि सुरक्षा, आर्थिक आणि वित्तीय सहकार्य आणि शाश्वत विकास यावर सफल चर्चा झाली.पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये तिआनजीन येथे आगमन
August 30th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच चीनमध्ये दाखल झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेल्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हा दौरा करत आहेत. तियानजिन येथील शिखर परिषद होत असताना ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि इतर नेत्यांची भेट घेणार आहेत.जपान आणि चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
August 28th, 08:40 pm
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून, मी 15 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.पंतप्रधानांचा जपान आणि चीन दौरा
August 22nd, 06:15 pm
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अनुक्रमे 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला आणि 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान चीनला भेट देणार आहेत. जपानमध्ये, पंतप्रधान 15 व्या वार्षिक भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी होणार असून जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी चर्चा करतील. चीनमध्ये पंतप्रधान तियानजिनमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
August 19th, 07:34 pm
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन
July 09th, 09:54 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून 22व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी दिलेल्या निमंत्रणावरून 8-9 जुलै 2024 रोजी रशियन महासंघाला अधिकृत भेट दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन
July 04th, 01:29 pm
शांघाय सहकारी संघटना (एससीओ) शिखर परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे भाषण वाचून दाखवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन
July 04th, 01:25 pm
2017 साली कझाकस्तानच्या अध्यक्षपदाच्या काळात मिळालेले एससीओ चे सदस्यत्व भारतासाठी गौरवास्पद आहे. तेव्हापासून आपण एससीओ मधील अध्यक्षपदाचे एक अखंड आवर्तन पूर्ण केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
June 25th, 06:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्यात आज दूरध्वनी संभाषण झाले.23व्या एस सी ओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद
July 04th, 12:30 pm
आज या तेविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. संपूर्ण आशिया खंडात गेल्या दोन दशकांमध्ये शांतता, समृद्धी आणि विकासासाठी एस सी ओ एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. भारत आणि या प्रदेशातील हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक बंध आणि लोकांचे लोकांशी असलेले संबंध हे आपल्या एकत्रित वारशाचे जिवंत उदाहरण आहे. आम्ही हे क्षेत्र एक विस्तारित शेजार म्हणून नव्हे तर एक विस्तारित कुटुंब म्हणून पाहतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा
December 16th, 03:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांच्याशी झाली बैठक
September 16th, 11:41 pm
शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने उझबेकीस्तानात समरकंद इथे काल 16 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांची भेट झाली.शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत भेट
September 16th, 11:06 pm
उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी भेट घेतली. राष्ट्रपती रायसी यांनी 2021मधे पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरची ही पहिली भेट होती.पंतप्रधानांनी उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे रशियन महासंघाच्या अध्यक्षांची घेतली भेट
September 16th, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) 22 व्या बैठकीच्या निमित्ताने आज रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे भेट घेतली.पंतप्रधान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक
September 16th, 08:34 pm
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) सदस्य देशांच्या प्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने, उझबेकिस्तानच्या समरकंद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांची भेट घेतली.शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 16th, 01:30 pm
आज, जेव्हा संपूर्ण जग महामारीनंतर ,आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येण्यासाठीच्या आव्हानांना तोंड देत असताना ,शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ,शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये राहते. भारत शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमधील अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक अडथळे आले. त्यामुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे.शांघाय सहकार्य संघटनेने आमच्या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क सुविधा आवश्यक आहेत , त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना माल वाहतुकीसंदर्भातील पूर्ण अधिकार देणेही महत्त्वाचे आहे.