भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.Joint Statement following the 23rd India - Russia Annual Summit
December 05th, 05:43 pm
At the invitation of PM Modi, Russian President Putin paid a State Visit to India for the 23rd India–Russia Annual Summit. The Leaders positively assessed the multifaceted and mutually beneficial India–Russia relations that span all areas of cooperation. As this year marks the 25th anniversary of the Declaration on Strategic Partnership between India and Russia, the two Leaders reaffirmed their support for further strengthening the Special and Privileged Strategic Partnership.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.केंद्रीय मंत्रिमंडळाची जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाच्या (BRCP) तिसऱ्या टप्प्याला मंजुरी
October 01st, 03:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने जैववैद्यकीय संशोधन करिअर कार्यक्रमाचा (BRCP) तिसरा टप्पा सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम जैवतंत्रज्ञान विभाग आणि युनायटेड किंगडमच्या वेलकम ट्रस्ट यांच्या भागीदारीत आणि विशेष उद्देश संस्था असलेल्या इंडिया अलायन्स मार्फत राबवण्यात येत आहे. 2025-26 ते 2030-31 या तिसऱ्या टप्प्यासाठी तसेच 2030-31 पर्यंत मंजूर झालेल्या शिष्यवृत्त्या आणि अनुदानांसाठी पुढील सहा वर्षे (2031-32 ते 2037-38) तो सुरू राहील. यासाठी एकूण 1500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, त्यात जैवतंत्रज्ञान विभाग 1000 कोटी रुपये आणि यूकेमधील वेलकम ट्रस्ट 500 कोटी रुपयांचा वाटा उचलणार आहे.वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 2277.397 कोटी रुपयांच्या खर्चाच्या "क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास" या योजनेला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी
September 24th, 05:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एकूण 2277.397 कोटी रुपयांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग / वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (DSIR/CSIR) क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास या विषयावरील योजनेला मान्यता देण्यात आली आहे.नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 12th, 04:54 pm
आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 12th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
September 06th, 06:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला
August 18th, 08:09 pm
संपूर्ण देशाला अभिमानास्पद कामगिरी करणारे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. उभयतांच्या या भेटीदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील आपले अनुभव, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारताची प्रगती आणि देशाचा महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम - गगनयान यासह विविध विषयांवर चर्चा केली.18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
August 12th, 04:34 pm
64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला केले संबोधित
August 12th, 04:33 pm
भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे विधान प्रथम केले. शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला! असे पंतप्रधानांनी नमूद केले.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
August 05th, 04:31 pm
भारत आणि फिलिपिन्स दरम्यान धोरणात्मक भागीदारी स्थापन झाल्याची घोषणास्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासोबत पंतप्रधानांनी केलेल्या संवादाचे भाषांतर
June 28th, 08:24 pm
आज तुम्ही मातृभूमीपासून, भारतभूमीपासून, सर्वात दूर आहात, पण भारतीयांच्या हृदयाच्या सर्वात जवळ आहात. तुमच्या नावातही शुभ आहे आणि तुमचा हा प्रवास एका नव्या युगाची सुरुवातही आहे. यावेळी बोलत आहोत आपण दोघे, पण माझ्यासोबत 140 कोटी भारतवासीयांच्या भावना देखील आहेत. माझ्या आवाजात सर्व भारतीयांचा उत्साह आणि आकांक्षा समाविष्ट आहेत. अंतराळात भारताचा झेंडा फडकवल्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ घेत नाहीये, तर सर्वात आधी हे सांगा, तिथे सर्व क्षेम-कुशल आहे ना? तुमची तब्येत ठीक आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत संवाद
June 28th, 08:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) जाणारे पहिले भारतीय ठरलेल्या ग्रुप कॅप्टन शुभ्रांशु शुक्ला यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की शुभांशु शुक्ला सध्या भारतीय मातृभूमीपासून सर्वात दूर असले तरी ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या सर्वाधिक समीप आहेत. शुभांशु यांच्या नावातच शुभत्व आहे आणि त्यांची ही अंतराळ यात्रा एका नव्या युगाची सुरुवात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मोदी म्हणाले की हे दोन व्यक्तींमधील संभाषण असले तरी ते 140 कोटी भारतीयांच्या भावना आणि उत्साह व्यक्त करत आहे. शुभांशु यांच्याशी बोलणारा हा आवाज संपूर्ण देशाचा सामूहिक उत्साह आणि अभिमान घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले, आणि अवकाशात भारताचा ध्वज फडकवल्याबद्दल त्यांनी शुभांशु यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी शुभांशु यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अंतराळ स्थानकावर सर्व काही ठीक आहे का, याची चौकशी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशिया प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांची भेट
June 18th, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झाग्रेब येथे क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहिम आंद्रेज प्लेनकोविक यांची भेट घेतली. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट असल्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील संबंधांचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक बांस्की द्वोरी पॅलेस येथे आगमन होताच पंतप्रधान प्लेनकोविक यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाग्रेब विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विशेष बाब म्हणून पंतप्रधान प्लेनकोविक यांनी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले.भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदानामधील पंतप्रधानांनी दिलेल्या माध्यम निवेदनाचे भाषांतर
March 17th, 01:05 pm
मी पंतप्रधान लक्सन आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान लक्सन यांचे भारताशी जुने संबंध आहेत.आपण सर्वांनी पाहिले की काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑकलंडमध्ये होळीचा सण किती आनंदाने साजरा केला! पंतप्रधान लक्सन यांना न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांबद्दल असलेले प्रेम त्यांच्यासोबत भारतात आलेल्या समुदायाच्या शिष्टमंडळावरून दिसून येते.यावर्षी रायसीना संवादाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्यासारखा तरुण, उत्साही आणि प्रतिभावान नेता असणे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.