भारत आणि भूतानमधील अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 21st, 07:16 pm

भारत आणि भूतान दरम्यानची अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीतील सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये भूतानचे पंतप्रधान महामहिम त्शेरिंग तोबगे यांच्या भाषणाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी केले.

पंतप्रधान येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार

February 19th, 06:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोब्ग्ये यांचे या प्रसंगी बीजभाषण होणार आहे.