नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

September 12th, 04:54 pm

आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

September 12th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमाकांत रथ यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

March 16th, 02:53 pm

प्रख्यात कवी आणि विद्वान रमाकांत रथ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. रमाकांत रथ यांचे साहित्य विशेषतः कवितांनी, समाजाच्या सर्व घटकांमध्ये व्यापक लोकप्रियता मिळवली आहे.

दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी रोजी करणार

February 20th, 07:30 pm

मराठीला अलिकडेच सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्या गौरवाचा आणखी एक भाग म्हणून आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे कौतुक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 11th, 02:00 pm

आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन

December 11th, 01:30 pm

महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

November 01st, 11:09 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas

October 17th, 10:05 am

PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.

PM Modi participates in International Abhidhamma Divas programme

October 17th, 10:00 am

PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑक्टोबर रोजी कौटिल्य आर्थिक परिषदेत होणार सहभागी

October 03rd, 10:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ताज पॅलेस हॉटेल, नवी दिल्ली येथे संध्याकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेत सहभागी होतील.यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

आसाममध्ये गुवाहाटी इथे खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

February 19th, 08:42 pm

आसामचे मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अनुराग ठाकूर जी, आसाम सरकारचे मंत्री, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले युवा खेळाडू!

ईशान्येकडील राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 19th, 06:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे ईशान्येतील सात राज्यांमध्ये आयोजित खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला संबोधित केले. खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार केलेल्या फुलपाखराच्या आकारातील अष्टलक्ष्मी, शुभंकराची पंतप्रधान मोदी यांनी नोंद घेतली. ईशान्येकडील राज्यांना नेहमीच अष्टलक्षी असे संबोधणारे पंतप्रधान म्हणाले, “या खेळांमध्ये फुलपाखराच्या आकारातले शुभंकर बनवणे म्हणजे ईशान्येच्या आकांक्षांना कसे नवीन पंख मिळत आहेत, याचेही प्रतीक आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

February 08th, 01:00 pm

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.

पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

February 08th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

Prime Minister condoles demise of Telugu, Sanskrit scholar, Shri Kandlakunta Alaha Singaracharyulu

August 14th, 09:35 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the demise of Telugu, Sanskrit scholar, Shri Kandlakunta Alaha Singaracharyulu.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 07th, 04:16 pm

काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

August 07th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा

January 02nd, 09:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू स्मृती संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पंतप्रधानांनी तरुणांमध्ये संशोधन, शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासह इतिहासाला अधिक आकर्षक बनविण्यावर भर दिला.पीएम-संग्रहालय तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय करण्याच्या मार्गांवरही पंतप्रधानांनी चर्चा केली.

प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक पंडित रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

May 22nd, 04:17 pm

प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक पंडित रेवा प्रसाद द्विवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी ग्यानी जोगिंदरसिंग वेदांती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

May 15th, 11:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्यानी जोगिंदरसिंग वेदांती जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.