मदिना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

November 17th, 12:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील मदिना येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांप्रति तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद अल अल-शेख यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

September 24th, 08:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे ग्रँड मुफ्ती, शेख अब्दुलअजीज बिन अब्दुल्ला बिन मोहम्मद अल-शेख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या समारोपाबाबत संयुक्त निवेदन

April 23rd, 12:44 pm

सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्या निमंत्रणावरून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.

करारांची सूची : पंतप्रधानांचा सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा

April 23rd, 02:25 am

22 एप्रिल 2025 रोजी जेद्दाह येथे भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या (एसपीसी) नेत्यांची दुसरी बैठक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांच्या सह-अध्यक्षतेखाली झाली. परिषदेने एसपीसी अंतर्गत विविध समित्या, उपसमित्या आणि कार्यकारी गटांच्या कामाचा आढावा घेतला, ज्यामध्ये राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यांचा समावेश आहे. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी इतिवृत्तांवर स्वाक्षरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुस्लिम वर्ल्ड लीगच्या सरचिटणीसांनी घेतली भेट

April 23rd, 02:23 am

मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी आज जेद्दाह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी कठोर शब्दात निषेध केला असून निष्पाप जीव गमावल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे महामहिम युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची घेतली भेट; तसेच भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेचे भूषवले सह-अध्यक्षपद

April 23rd, 02:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल , 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली. सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांनी जेद्दाह येथील रॉयल पॅलेसमध्ये पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत केले.

PM Modi arrives in Jeddah, Saudi Arabia

April 22nd, 04:29 pm

PM Modi arrived in Jeddah, Saudi Arabia at the invitation of His Royal Highness Prince Mohammed bin Salman. In a special gesture, Saudi Air Force jets escorted PM Modi’s plane upon entering Saudi airspace, accompanying it to Jeddah. PM Modi received a grand welcome in Jeddah. He will participate in various programmes in Saudi Arabia.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन

April 22nd, 08:30 am

मी आज, सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान, महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर जात आहे.

धोरणात्मक रिसेट: पंतप्रधान मोदींच्या सौदी भेटीमुळे पश्चिम आशियातील भारताची भूमिका अधिक दृढ होणार

April 21st, 04:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 22-23 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट देत आहेत — जागतिक महासत्तेच्या बदलत्या परिमाणांमध्ये सत्ताकेंद्र अन्यत्र सरकत असताना वेगाने बदलत असलेला पश्चिम आशिया आकारास येत असतानाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांची ही भेट होत आहे.

पंतप्रधान मोदी 22 आणि 23 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट देणार

April 19th, 01:55 pm

रॉयल हायनेस प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या भेटीमुळे उभय देशांदरम्यानची बहुआयामी भागीदारी अधिक दृढ आणि बळकट करण्याची तसेच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी मिळेल.

आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे : पंतप्रधान

January 13th, 06:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्यासमवेत करण्यात आलेल्या हज करार 2025 चे स्वागत केले आहे. हा करार भारतातील हज यात्रेकरूंसाठी चांगली बातमी आहे, असे मोदी म्हणाले. आमचे सरकार भाविकांसाठी तीर्थयात्रेचा उत्तम अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन

July 28th, 11:37 pm

भारत-सौदी अरेबियाच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची पहिली बैठक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीझ बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 21st, 06:31 am

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे. काश्मीर आणि श्रीनगरमधले हे वातावरण, ही ऊर्जा आणि अनुभूती, योगसाधनेतून जी शक्ती आपल्याला मिळते, ती श्रीनगरमध्ये जाणवते आहे. योग दिनानिमित्त मी आज काश्मीरच्या या भूमीवरून देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील योगसाधना करणाऱ्या सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देतो.

आंतरराष्ट्रीय योग दिन -2024 निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित

June 21st, 06:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योग सत्रात सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा

December 26th, 08:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 26th, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.

जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण

September 26th, 04:12 pm

दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .

जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित

September 26th, 04:11 pm

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.

भारत-सौदी अरेबिया राजनैतिक भागीदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन

September 11th, 03:51 pm

आज भारत-सौदी अरेबिया यांच्यातील राजनैतिक भागीदारी परिषदेच्या पहिल्या नेतृत्व बैठकीत सहभागी होत असतांना मला अतिशय आनंद होत आहे. 2019 च्या माझ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान आम्ही या परिषदेची घोषणा केली होती.