Previous govts have for decades neglected the fishermen community. But now the NDA govt is progressing and boosting them to unlimited capabilities: PM

March 11th, 01:00 pm

Addressing the Golden Jubilee celebrations of the Akhila Kerala Dheevara Sabha, Prime Minister Narendra Modi said the occasion marked a historic milestone as the organisation completed 50 years of service to the fishermen community. Congratulating the members and fishermen across Keralam, the PM iterated, “For five decades, this organisation has worked continuously to protect the rights of fishermen. This journey reflects your hard work, dedication and spirit of service.”

PM Modi addresses Akhila Kerala Dheevara Sabha’s Golden Jubilee celebrations

March 11th, 12:30 pm

Addressing the Golden Jubilee celebrations of the Akhila Kerala Dheevara Sabha, Prime Minister Narendra Modi said the occasion marked a historic milestone as the organisation completed 50 years of service to the fishermen community. Congratulating the members and fishermen across Keralam, the PM iterated, “For five decades, this organisation has worked continuously to protect the rights of fishermen. This journey reflects your hard work, dedication and spirit of service.”

India – France Joint Statement

February 18th, 08:10 am

At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.

एलव्हीएम3-एम6 आणि ब्लूबर्ड ब्लॉक-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी अवकाश शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले अभिनंदन

December 24th, 10:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेल्या सर्वात वजनदार उपग्रह एलव्हीएम3-एम6 आणि अमेरिकेच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 या अंतराळयानाचे त्यांच्या इच्छित कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अंतराळ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा एक अभिमानास्पद टप्पा आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी

November 30th, 11:30 am

या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.

जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन: सत्र 2

November 22nd, 09:57 pm

नैसर्गिक आपत्ती या मानवतेसाठी खूप मोठे आव्हान बनल्या आहेत. या वर्षीही नैसर्गिक आपत्तींमुळे जगातील लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज यावरून स्पष्ट होते.

जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी

November 22nd, 09:35 pm

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.

गुजरातमधील सूरत येथे भारताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद

November 16th, 03:50 pm

“तुम्हाला काय वाटतं? कामाची गती योग्य आहे का? तुम्ही ठरवलेल्या वेळापत्रकानुसार काम सुरू आहे का की काही अडचणी येत आहेत?”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला

November 16th, 03:47 pm

गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्‍चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली.

भारताच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह सीएमएस-03 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोचे अभिनंदन

November 02nd, 07:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे भारताच्या सर्वांत वजनदार दूरसंवाद उपग्रह सीएमएस-03 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

August 23rd, 11:00 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे साथीदार, इस्रो आणि अंतरिक्ष क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञ, अभियंते आणि माझ्या प्रिय देशवासीयांनो !

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन

August 23rd, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय अंतराळ दिन 2025 च्या निमित्ताने व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या वर्षीची संकल्पना “आर्यभट्ट ते गगनयान” अशी असून, ती भारताचा भूतकाळातील आत्मविश्वास आणि भविष्यातील निश्चय या दोहोंचे प्रतिबिंब आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

अंतराळ संशोधनावरील (स्पेस एक्सप्लोरेशन) जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलेले संबोधन

May 07th, 12:00 pm

ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (अंतराळ संशोधन परिषद) 2025 मध्ये आपल्या सर्वांबरोबर सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अंतराळ हा केवळ एक टप्पा नसून, जिज्ञासा, साहस आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारताचा अंतराळ प्रवास याच भावनेचे प्रतिबिंब आहे. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्यापर्यंतचा आमचा प्रवास उल्लेखनीय आहे. आमची रॉकेट केवळ पेलोडच नव्हे तर एक अब्ज चाळीस कोटी भारतीयांची स्वप्ने सोबत घेऊन जातात. भारताची कामगिरी हे एक महत्वाचे वैज्ञानिक यश आहे. शिवाय मानवी आकांक्षा गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध करू शकते, याचा हा पुरावा आहे. भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास रचला होता. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सहाय्य केले. चांद्रयान-2 ने आपल्याला चंद्राची सर्वाधिक रिझोल्यूशनची (स्पष्ट) छायाचित्र पाठवली. चांद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपल्याला अधिक माहिती पुरवली. आम्ही विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन तयार केले. आम्ही एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले. आम्ही आमच्या प्रक्षेपण वाहनां द्वारे 34 देशांचे 400 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यावर्षी आम्ही दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले, जे एक मोठे पाऊल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला केले संबोधित

May 07th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक अंतराळ संशोधन परिषद (GLEX) 2025 ला संबोधित केले. जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, वैज्ञानिक आणि अंतराळवीरांचे त्यांनी स्वागत केले. GLEX 2025 मध्ये त्यांनी भारताचा उल्लेखनीय अंतराळ प्रवास अधोरेखित केला. ते म्हणाले की, अंतराळ हे केवळ एक गंतव्यस्थान नाही तर कुतूहल, धैर्य आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे.

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 27th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.

न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण

April 08th, 08:30 pm

या शिखर परिषदेद्वारे तुम्ही मला देश आणि जगभरातील आदरणीय पाहुण्यांशी तसेच तुमच्या प्रेक्षकांशी जोडण्याची संधी दिल्याबद्दल मी नेटवर्क 18 चे आभार मानतो. तुम्ही या वर्षीच्या शिखर परिषदेला भारताच्या तरुणांच्या आकांक्षांशी जोडले आहे, याचा मला आनंद आहे. या वर्षीच्या सुरुवातीला, विवेकानंद जयंतीला, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग येथेच भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, मला तरुणांच्या डोळ्यात स्वप्नांची चमक, त्यांच्या दृढनिश्चयाची ताकद आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची त्यांचा ध्यास दिसला. जर आपण 2047 पर्यंत भारताला कोणत्या उंचीवर नेण्याची आपली आकांक्षा आहे आणि आपण ज्या पथदर्शीचे अनुसरण करत आहोत त्याचा विचार जर आपण प्रत्येक पावलागणिक करत राहिलो तर 'अमृत' नक्कीच उदयास येईल. आणि हे 'अमृत' 'अमृत काल' च्या पिढीला ऊर्जा आणि दिशा तसेच भारताला गती प्रदान करेल. मी या शिखर परिषदेबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 रायझिंग भारत शिखर परिषदेला केले संबोधित

April 08th, 08:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि जगभरातील आदरणीय अतिथींशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी नेटवर्क18 चे आभार मानले. या वर्षीची शिखर परिषद भारताच्या युवकांच्या आकांक्षांवर केंद्रित असल्याचे त्यांनी कौतुक केले. या वर्षीच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित 'विकसित भारत युवा नेता संवाद 'चे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची स्वप्ने , दृढनिश्चय आणि आवड यांचा उल्लेख केला. त्यांनी 2047 पर्यंत भारताच्या प्रगतीच्या रुपरेषेबाबतवर भर देत सांगितले की प्रत्येक टप्प्यावर निरंतर विचारमंथन केल्याने मौल्यवान विचार अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. ही माहिती अमृत काळातील पिढीला ऊर्जा देईल , मार्गदर्शन करेल आणि गतिमान करेल असे त्यांनी नमूद केले. त्यांनी शिखर परिषदेच्या यशासाठी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

February 23rd, 11:30 am

काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.

पिक्सलस्पेस द्वारे भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह भारतातील युवकांच्या असाधारण प्रतिभेचे दर्शन घडवतो : पंतप्रधान

January 17th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की पिक्सलस्पेस द्वारे भारतातील पहिला खाजगी उपग्रह समूह भारतातील युवकांच्या असाधारण प्रतिभेचे दर्शन घडवतो . अंतराळ उद्योगात आपल्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमता यातून अधोरेखित होतात असे मोदी यांनी नमूद केले.

अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इस्रोचे अभिनंदन

January 16th, 01:36 pm

अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि संपूर्ण अंतराळ संशोधन समुदायाचे अभिनंदन केले आहे.आगामी काळात भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.