पंतप्रधान 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात होणार सहभागी

September 30th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10: 30 वाजता नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. या प्रसंगी, पंतप्रधान राष्ट्रासाठी आरएसएसच्या योगदानावर प्रकाश टाकणारे विशेषत्वाने तयार केलेले स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील आणि सभेला संबोधित करतील.