भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल परिवर्तन पारितोषिक 2025 मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
March 16th, 02:00 pm
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल परिवर्तन पारितोषिक 2025 मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वतःच्या तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या प्रवाह व सारथी या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचे महत्व जाणून युनायटेड किंग्डम च्या सेंट्रल बँकिंग ने त्यांना डिजिटल परिवर्तन पारितोषिक 2025 ने सन्मानित केले आहे.