युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सारनाथचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
July 25th, 07:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
September 12th, 04:54 pm
आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
September 12th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 11th, 11:00 am
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
April 11th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत
April 09th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.थायलंडमध्ये संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
February 14th, 08:30 am
थायलंडमधील संवादच्या या आवृत्तीत तुम्हा सर्वांसोबत सहभागी होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारत, जपान आणि थायलंडमधील अनेक प्रतिष्ठित संस्था आणि मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो आणि सर्व सहभागींना शुभेच्छा देतो.थायलंडमधील संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
February 14th, 08:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी थायलंडमधील संवादच्या कार्यक्रमाच्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबतचा सन्मान व्यक्त केला आणि हा कार्यक्रम साध्य केल्याबद्दल भारत, जपान आणि थायलंडमधील प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे कौतुक केले. त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथील स्वरवेद मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
December 18th, 12:00 pm
काशी येथील वास्तव्याचा आजचा माझा दुसरा दिवस आहे. नेहमीप्रमाणे, काशीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण खरोखरच अद्भुत असतो, अद्भुत अनुभवांनी भरलेला असतो. तुम्हाला आठवत असेल, दोन वर्षांपूर्वी आपण अखिल भारतीय विहंगम योग संस्थानाच्या वार्षिक समारंभात अशाच पद्धतीने एकत्र आलो होतो. मला पुन्हा एकदा विहंगम योग संत संस्थानाच्या शताब्दी सोहळ्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. विहंगम योग साधनेच्या या यात्रेने 100 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे. महर्षी सदाफल देवजींनी मागच्या शतकात ज्ञान आणि योगसाधनेची दिव्य ज्योत प्रज्वलित केली होती. शंभर वर्षांच्या या प्रवासात, या दिव्य ज्योतीने देशभरातील आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे. या पावन प्रसंगी येथे 25 हजार कुंडीय स्वरवेद ज्ञान महायज्ञही आयोजित करण्यात आला आहे. या महायज्ञातील प्रत्येक आहुती विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो, या विश्वासामुळे मला मनापासून आनंद वाटतो. या प्रसंगी मी महर्षी सदाफल देवजींना विनम्र अभिवादन करतो आणि पूर्ण भक्तीभावाने त्यांच्याप्रती माझ्या हृदयस्थ भावना समर्पित करतो. आपल्या गुरूंची परंपरा अखंडपणे पुढे नेणाऱ्या सर्व संतांनाही मी विनम्र अभिवादन करतो.पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्वर्वेद महामंदिराचे केले उद्घाटन
December 18th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील उमराहा येथे स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी महर्षी सदाफल देवजी महाराज यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली आणि मंदिर परिसराला फेरफटका देखील मारला.जी- 20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 26th, 10:15 am
काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये आपले स्वागत आहे. माझा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये तुमची बैठक होत आहे याचा मला आनंद होत आहे. काशी हे केवळ जगातील सर्वात जुने जिवंत शहर नाही. येथून सारनाथ फार दूर नाही, जिथे भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला होता.काशीला ‘विज्ञान, धर्म आणि सत्यराशि’चे शहर असे म्हटले जाते. ज्ञान, कर्तव्य आणि सत्याचा खजिना. ही खरोखरच भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे.मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून गंगा आरती पाहण्यासाठी, सारनाथला भेट देण्यासाठी आणि काशीच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी थोडा वेळ ठेवला असेल.जी-20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन
August 26th, 09:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथे जी-20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. काशी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये पंतप्रधानांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या शहरात ही बैठक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काशी हे सर्वाधिक प्राचीन शहरांपैकी एक असल्याचे सांगत, भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन ज्या ठिकाणी दिले त्या सारनाथच्या जवळ हे शहर असल्याचा उल्लेख केला. “काशीला ज्ञान, कर्तव्य आणि सत्य यांचा खजिना मानले जाते आणि खरोखरच ती भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे”, पंतप्रधान म्हणाले. गंगा आरती कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांनी सारनाथला देखील भेट द्यावी आणि काशीमधील आमच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा असे पंतप्रधानांनी सुचवले.दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 20th, 10:45 am
कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य किरेन रिजिजूजी, किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, मीनाक्षी लेखीजी, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे सरचिटणीस, देश-परदेशातून या ठिकाणी आलेले आणि आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व आदरणीय भिक्षू, इतर मान्यवर आणि सभ्य स्त्री-पुरूषहो,नवी दिल्लीत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन
April 20th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत हॉटेल अशोका इथे आजपासून सुरु झालेल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी, पंतप्रधानांनी इथे आयोजित फोटो प्रदर्शन पहिले आणि बुद्धांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण केली. तसेच यावेळी उपस्थित एकोणीस मान्यवर बौद्ध भिक्खूना त्यांचा पोशाख चीवर भेट दिला.2566 वी बुद्ध जयंती आणि लुंबिनी दिवस 2022 निमित्त नेपाळ येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 16th, 09:45 pm
याआधीही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला भगवान बुद्धांशी संबंधित दैवी स्थळांना, त्यांच्याशी निगडित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. आणि आज मला भारताचा मित्र देश नेपाळमध्ये भगवान बुद्धांचे पवित्र जन्मस्थान लुंबिनीला भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. काही वेळापूर्वी मला मायादेवी मंदिरात जाण्याची संधी मिळाली, ती देखील माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झाला, तिथली ऊर्जा, तिथले चैतन्य, ही एक वेगळीच अनुभूती आहे. 2014 मध्ये मी या ठिकाणी भेट दिलेल्या महाबोधीच्या रोपाचे रुपांतर आता वृक्षात होत आहे हे पाहून मला आनंद होत आहे.लुंबिनी, नेपाळ येथे बुद्ध जयंती साजरी
May 16th, 03:11 pm
नेपाळमधील लुंबिनी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मेडिटेशन हॉलमध्ये 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, आणि त्यांची पत्नी डॉ. आरझू राणा देउबा हेदेखील होते.