It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील सोमनाथ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरपूर्वक आदरांजली वाहिली
May 11th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधील सोमनाथ मंदिर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
December 15th, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भारताला एकतेच्या सूत्रात गुंफण्यासाठी समर्पित केले.केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता शपथ दिली, पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी कार्यक्रमात झाले सहभागी
October 31st, 02:06 pm
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज एकता शपथ घेतली आणि राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा दृढ केली.पंतप्रधान 30-31ऑक्टोबर रोजी गुजरातचा दौरा करणार
October 29th, 10:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30-31 ऑक्टोबर रोजी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान, 30 ऑक्टोबर रोजी, केवडिया येथील एकता नगर येथे जाणार असून सायंकाळी 5:15 च्या सुमाराला ते ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते एकता नगर येथे सायंकाळी 6:30 च्या सुमाराला 1,140 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
October 26th, 11:30 am
अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 27th, 11:30 am
मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
May 27th, 11:09 am
गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आज गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी शहरी विकास वर्ष 2005 ची 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शहरी विकास वर्ष 2025 ला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या त्यांच्या भेटीदरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जयघोष आणि फडकणारे तिरंगी ध्वज या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह त्यांना अनुभवायला मिळाला आहे. ही दृश्य संस्मरणीय असून, ही भावना केवळ गुजरातमध्येच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती, असे ते म्हणाले.भारताने दहशतवादाचा काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने तो पूर्ण केला , असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत
April 09th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले
October 31st, 08:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की अदम्य उर्जा, द्रष्टे नेतृत्व आणि असामान्य समर्पणभाव या मूल्यांसह सरदार पटेल यांनी आपल्या देशाचे भाग्य घडवले.पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार
October 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.