Prime Minister pays homage to great social reformer Shri Sant Sevalal Maharaj

February 15th, 02:49 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to the great social reformer Shri Sant Sevalal Maharaj on his birth anniversary, today. “By spreading the message of truth, non-violence, and high moral values, he instilled a new consciousness in society. His inspiring life will forever continue to guide the people of the country”, Shri Modi said.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री सेवालाल जी महाराज यांना अर्पण केली आदरांजली

October 05th, 02:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी त्यांना अभिवादन केले. श्री सेवालाल जी महाराज हे समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

वाशिम, महाराष्ट्र येथे कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील उपक्रमांच्या आरंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

October 05th, 12:05 pm

आजच्या भव्य सभेत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण देशभरातील आमच्या आदरणीय बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो - जय सेवालाल! जय सेवालाल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा केला शुभारंभ

October 05th, 12:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशिम येथे सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. या उपक्रमांमध्ये पीएम-किसान (PM-KISAN) सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता जारी, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण, 9,200 शेतकरी उत्पादक संस्था, संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क, आणि पशुधनासाठी युनिफाइड जीनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ, याचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा करणार शुभारंभ

October 04th, 05:39 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते वाशिमकडे प्रयाण करतील आणि सकाळी 11.15 वाजता पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सकाळी 11:30 वाजता, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. दुपारी 4 वाजता, पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता, मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते आरे जेव्हीएलआर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पंतप्रधान बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान मेट्रो द्वारा प्रवास देखील करणार आहेत.