आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्यांना पंतप्रधानांची आदरांजली
June 25th, 10:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असल्याचा उल्लेख केला. या काळात मूक न राहता संविधानात अंतर्भूत असलेल्या आदर्शांचे रक्षण करणाऱ्या असंख्य नागरिकांचे असामान्य धैर्य आणि चिकाटीही दिसून आली, असे त्यांनी नमूद केले.संविधान हत्या दिवस, भारतीय राज्यघटना कशी पायदळी तुडवली गेली याची आठवण करून देणारा दिवस ठरेल : पंतप्रधान.
July 12th, 05:06 pm
25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून घोषित केल्याने, भारतीय संविधान पायदळी तुडवले गेलेल्या काळाची आठवण करून देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.