Samrat Samprati Museum is the heritage of millions of people in India, heritage of India's glorious past: PM Modi in Gandhinagar, Gujarat
March 31st, 10:25 am
PM Modi inaugurated the Samrat Samprati Sangrahalay, Jain Heritage Museum at Koba Tirth in Gandhinagar, Gujarat, on the auspicious occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak. Speaking on the occasion, the PM said the Sangrahalay belongs to the crores of people of India and stands as a testament to our glorious past. Lauding the ahimsa philosophy of Samrat Samprati, he called on people to rise above personal aspirations and work for the nation.महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाचे उद्घाटन
March 31st, 10:15 am
भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालय या जैन वारसा संग्रहालयाचे उद्घाटन झाले. “कोबा तीर्थ आध्यात्मिक शांततेने भरुन गेले आहे, याठिकाणी अनेक जैन मुनींची आणि संतांची तपस्या फळाला आली आणि इथे सर्जनशीलता व सेवाभाव नैसर्गिकरित्या फुलला,” असे मोदी म्हणाले.पंतप्रधान उद्या 31 मार्च रोजी गुजरातला भेट देणार
March 30th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 31 मार्च 2026 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. या दिवशी सकाळी 10 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथील सम्राट संप्रति वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर दुपारी साधारण पाऊण वाजता ते अहमदाबाद मध्ये साणंद येथील कायनेस सेमीकॉन कारखान्याचे उद्घाटन करतील तसेच उपस्थित जनतेला संबोधित देखील करतील. त्यानंतर ते वाव-थराड येथे पोहोचतील आणि तेथे दुपारी चार वाजता ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील.