Ganga Expressway to become new lifeline of Uttar Pradesh’s development: PM Modi in Hardoi
April 29th, 11:35 am
PM Modi inaugurated the 594-km access-controlled Ganga Expressway in Hardoi, calling it a new lifeline for Uttar Pradesh’s development that will boost connectivity, support farmers and create industrial opportunities across multiple districts. He said the expressway will also bring the possibilities of the NCR closer and strengthen the state’s role in the journey towards Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई इथे, 594 किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
April 29th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील हरदोई इथे 594 किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी, भगवान नरसिंह यांच्या पवित्र भूमीला वंदन करून आणि जवळच वाहणाऱ्या गंगामातेच्या दैवी उपस्थितीचा उल्लेख करून केली. संपूर्ण उत्तरप्रदेश, गंगा नदीच्या आध्यात्मिक आणि पालनपोषण करणाऱ्या कृपेने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “उत्तर प्रदेशाला लाभलेले द्रुतगती मार्ग स्वतः गंगामातेचे आशीर्वाद आहेत,” असे मोदी म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे पवित्र स्थळांपर्यंतचा प्रवास काही तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.उत्तर प्रदेशातील संभल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
July 05th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील संभल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 11:00 am
सर्व संतांना विनंती आहे की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, पूज्य श्री अवधेशानंद गिरी जी, कल्किधामचे प्रमुख आचार्य प्रमोद कृष्णम् जी, पूज्य स्वामी कैलाशानंद ब्रह्मचारी जी, पूज्य सदगुरू श्री रितेश्वर जी, प्रचंड संख्येने आलेले, भारतातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले पूज्य संतगण, आणि माझ्या प्रिय श्रद्धाळू बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ
February 19th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ झाला.पंतप्रधानांनी यावेळी श्री कल्की धाम मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण देखील केले.आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या अध्यक्षतेखालील श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टतर्फे या मंदिराची उभारणी केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात अनेक संत, धार्मिक नेते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी श्री कल्की धामची करणार पायाभरणी
February 01st, 09:10 pm
श्री कल्की धामच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री आचार्य प्रमोद कृष्णम यांचे आभार मानले.