रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 14th, 04:43 pm
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मँतूरोव्ह यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
April 02nd, 07:17 pm
प्रथम उपपंतप्रधान मँतूरोव्ह यांनी, व्यापार आणि आर्थिक भागीदारी, खते, संपर्क जोडणी तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध यांसह परस्पर हिताशी संबंधीत विविध क्षेत्रांमधील सहकार्यपूर्ण भागिदारींच्या प्रगतीबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.Prime Minister Narendra Modi to inaugurate India AI Impact Expo 2026
February 15th, 02:21 pm
PM Modi will inaugurate the India AI Impact Expo 2026 on 16th February 2026 in New Delhi. The Expo, to be held from 16th to 20th February 2026 alongside the India AI Impact Summit, will serve as a national demonstration of AI in action. It will feature 13 country pavilions, bringing together global technology firms, startups, academia and research institutions, Union Ministries, State Governments and international partners.भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
January 03rd, 12:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
January 03rd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.फलनिष्पत्तींची यादीः रशियन महासंघाच्या अध्यक्षांची भारत भेट
December 05th, 05:53 pm
एका देशाच्या नागरिकांच्या दुसऱ्या देशाच्या भूभागातील तात्पुरत्या कामगार कामकाजासाठी भारत सरकार आणि रशियाचे सरकार यांच्यातील करारJoint Statement following the 23rd India - Russia Annual Summit
December 05th, 05:43 pm
At the invitation of PM Modi, Russian President Putin paid a State Visit to India for the 23rd India–Russia Annual Summit. The Leaders positively assessed the multifaceted and mutually beneficial India–Russia relations that span all areas of cooperation. As this year marks the 25th anniversary of the Declaration on Strategic Partnership between India and Russia, the two Leaders reaffirmed their support for further strengthening the Special and Privileged Strategic Partnership.India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum
December 05th, 03:45 pm
In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
December 05th, 02:00 pm
आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी राष्ट्रपती पुतीन यांनी आमच्या धोरणात्मक भागीदारीचा पाया घातला होता. 15 वर्षांपूर्वी 2010 मध्ये आमच्या भागीदारीला विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाला होता.PM Modi’s remarks during the joint press meet with Russian President Vladimir Putin
December 05th, 01:50 pm
PM Modi addressed the joint press meet with President Putin, highlighting the strong and time-tested India-Russia partnership. He said the relationship has remained steady like the Pole Star through global challenges. PM Modi announced new steps to boost economic cooperation, connectivity, energy security, cultural ties and people-to-people linkages. He reaffirmed India’s commitment to peace in Ukraine and emphasised the need for global unity in the fight against terrorism.पंतप्रधानांनी रशियाच्या अध्यक्षांचे केले स्वागत
December 05th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे भारतात स्वागत केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना 73 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
October 07th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. पंतप्रधानांनी पुतिन यांचे 73व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच पुढील वाटचालीतील यशासाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 8 ऑक्टोबर रोजी 9 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे करणार उद्घाटन
October 07th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:45 च्या सुमाराला नवी दिल्लीतील यशोभूमी, येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या 9 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे (आयएमसी) 2025 उद्घाटन करणार आहेत.रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 25th, 08:56 pm
रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्या शुभेच्छा
September 17th, 07:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणणण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
September 01st, 12:48 pm
चीनमधील तिआनजिन येथे आयोजित SCO शिखर परिषदेच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, यावेळी झालेल्या चर्चेत युक्रेन संघर्ष हा विषय केंद्रस्थानी होता. शांततेच्या दृष्टीने अलीकडे सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी स्वागत करत सर्व बाजू रचनात्मकरीत्या पुढे येतील अशी आशाही व्यक्त केली. हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची तसेच कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय शोधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मोठ्या प्रमाणात मानवी पैलूवर भर देऊन हा केवळ प्रादेशिक मुद्दा नसून मानवतेने दिलेली हाक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला
August 08th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.रशियातील विमान अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
July 24th, 11:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील झालेल्या दुःखद विमान अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपण रशिया आणि तिथल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.