The government places great emphasis on bringing a 'technology culture' to agriculture: PM Modi
March 06th, 01:14 pm
PM Modi addressed the Post Budget Webinar on the theme “Agriculture and Rural Transformation”. The PM highlighted programmes such as the PM Kisan Samman Nidhi and MSP reforms that benefit farmers. He also spoke about the “technology culture” in agriculture, referring to initiatives like e-NAM and the development of DPI. He called for suggestions on effectively integrating technology with traditional systems.PM Modi addresses Post Budget Webinar on Agriculture and Rural Transformation
March 06th, 01:00 pm
PM Modi addressed the Post Budget Webinar on the theme “Agriculture and Rural Transformation”. The PM highlighted programmes such as the PM Kisan Samman Nidhi and MSP reforms that benefit farmers. He also spoke about the “technology culture” in agriculture, referring to initiatives like e-NAM and the development of DPI. He called for suggestions on effectively integrating technology with traditional systems.पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार
September 16th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता धार येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह' अभियानाचा प्रारंभ होईल. यावेळी ते इतर अनेक उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.मिझोराममध्ये विकासकार्यांची पायाभरणी आणि उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 13th, 10:30 am
मिझोरामचे राज्यपाल व्ही. के. सिंह जी, मुख्यमंत्री श्री लालदुहोमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री अश्विनी वैष्णव जी, मिझोराम सरकारमधले मंत्रिगण, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी, मिझोरामच्या शानदार जनतेला शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चांच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 13th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.नेक्स्टजेन जीएसटी सुधारणा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम बनवतील तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करतील: पंतप्रधान नरेंद्र मोदी
September 04th, 08:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील दुग्ध उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेप्रती सरकारच्या अढळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पोषण सुरक्षेची खात्री करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पंतप्रधानांनी दखल घेतली.पंतप्रधान 2 ऑगस्ट रोजी वाराणसीला भेट देणार
July 31st, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यवधी भारतीयांसाठी ‘राहणीमानात सुलभता’ आणि प्रतिष्ठेला चालना देणारी: पंतप्रधान
June 10th, 09:54 am
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरांचा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खात्री करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी देशवासीयांना ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज’ स्पर्धेत सहभागी होण्याचे केले आवाहन
February 21st, 03:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना, विशेषतः युवा वर्गाला बेस्ट टुरिझम व्हिलेज, अर्थात ‘पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट गाव’ या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पर्यटन मंत्रालय बेस्ट टुरिझम व्हिलेज स्पर्धा सुरू करत आहे.विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ
September 08th, 02:49 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.सरकारने वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला दिली मंजुरी
September 08th, 02:49 pm
‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या दिशेने पावले टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10,683 कोटी रुपये खर्चाच्या हाताने तयार केलेले पोशाख, हाताने तयार केलेली वस्त्र आणि तंत्रज्ञान वस्त्रोद्योगाच्या 10 खंड/उत्पादने यांचा समावेश असलेल्या वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे.हिमाचल प्रदेशातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 06th, 11:01 am
हिमाचल प्रदेशाने आज एका प्रधानसेवकाच्या नात्यानेच नाही तर, परिवारातल्या एका सदस्याच्या नात्यानेही, मला अभिमानाच्या क्षणाची संधी दिली आहे. छोट्या-छोट्या सुविधांसाठी संघर्ष करणारा हिमाचलही मी पाहिला आहे आणि आज विकासाची गाथा लिहीत असलेला हिमाचलही पाहत आहे. हे सगळं देवी देवतांच्या आशीर्वादाने, हिमाचल सरकारच्या कार्यकौशल्याने आणि हिमाचलच्या जनतेच्या जागरूकतेमुळे शक्य होऊ शकलं आहे. मी पुन्हा एकदा, ज्या प्रत्येकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे सगळ्यांनी आपलं म्हणणं सांगितलं त्यांचे आभार व्यक्त करतो. मी संपूर्ण संघाचे आभार व्यक्त करतो. हिमाचलने एका संघाच्या रूपात काम करण्याची अद्भुत सिद्धि प्राप्त केली आहे. माझ्याकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !!पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेच्या आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद
September 06th, 11:00 am
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.पंतप्रधानांनी कोविड-19 संबधित परिस्थितीबद्दल काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेला संवाद
July 16th, 12:07 pm
कोरोना विरुद्ध देश या लढाईतील अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर आपण सर्वांनी आपापले म्हणणे मांडलेत. दोन दिवसांपूर्वीच नॉर्थ ईस्टच्या सर्व मुख्यमंत्र्यांसह याच विषयावर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. कारण जिथे जिथे चिंताजनक परिस्थिती आहे प्रामुख्याने त्या त्या राज्यांसोबत मी याबद्दल चर्चा करत आहे.कोविडविषयक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
July 16th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक,ओदिशा, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोविड बाबतच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्री आणि आरोग्य मंत्रीही यावेळी उपस्थित होते. कोविडशी लढा देण्यासाठी देण्यात येत असलेल्या सर्वतोपरी सहाय्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांचे आभार मानले. आपापल्या राज्यात, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलण्यात आलेली पावले आणि लसीकरणाची प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लसीकरण धोरणाबाबतही त्यांनी प्रतिसाद दिला.राज्ये आणि जिल्ह्यातल्या अधिका-यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
May 20th, 11:40 am
Prime Minister Shri Narendra Modi interacted with the state and district officials on the COVID-19 situation through video conference.कोविड -19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी साधला संवाद
May 20th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.राज्ये आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी साधलेला संवाद
May 18th, 11:40 am
आपण सगळ्यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतांना अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत आणि सातत्याने करत आहात. आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, जे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांभाळण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील इतर लोकांची उमेद वाढली आणि त्यांना आपल्यापासून प्रेरणा मिळाली.कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी साधला संवाद
May 18th, 11:39 am
कोविड स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टरांच्या गटाशी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
May 15th, 02:42 pm
देशातील कोविड आणि लसीकरण संबंधित परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील कोविडशी संबंधित सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.