पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
December 18th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन
September 11th, 12:30 pm
आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज कालावधीला 31.12.2024 नंतर मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
August 27th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान रस्त्यांवरील फेरीवाले आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या पुनर्रचना आणि कर्ज देण्याच्या कालावधीची मुदत 31.12.2024 नंतर वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. कर्ज देण्याचा कालावधी आता 31 मार्च 2030पर्यंत वाढविण्यात आला आहे. या योजनेचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. पुनर्रचित योजनेचा उद्देश 1.15 कोटी लाभार्थ्यांना लाभ देणे आहे ज्यामध्ये 50 लाख नवीन लाभार्थींचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
July 25th, 08:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माले येथील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात मालदीव प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली. या बैठकीपूर्वी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले आणि रिपब्लिक स्क्वेअर येथे त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही भेट स्नेहमय होती, आणि दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेल्या मैत्रीचा दाखला देणारी होती.हरियाणातल्या हिसार विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 14th, 11:00 am
हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. नायब सिंह सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री. मुरलीधर मोहोळ जी, हरियाणा सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिसार विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची केली पायाभरणी
April 14th, 10:16 am
विमानप्रवास सर्वांसाठी सुलभ, किफायशीर आणि सुरक्षित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी हरियाणाच्या लोकांना शुभेच्छा दिल्या, त्यांची शक्ती, खिलाडूवृत्ती आणि बंधुता ही हरियाणाची ओळख असल्याचे कौतुक त्यांनी केले. या व्यस्त कापणीच्या हंगामात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या आशीर्वादांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.अल्प मूल्याच्या भीम-यूपीआय व्यवहारांना(पी2एम) चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 19th, 04:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अल्प मूल्याच्या भीम-यूपीआय व्यक्ती ते व्यापारी (पी2एम ) व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला आज खालील स्वरुपात मंजुरी दिली.Our vision for the Global South will go beyond SAGAR-it will be MAHASAGAR: PM Modi
March 12th, 12:30 pm
During his visit to Mauritius, PM Modi emphasized the deep-rooted ties between the two nations, announcing an 'Enhanced Strategic Partnership' with PM Ramgoolam. India will assist in building a new Parliament, modernizing infrastructure, and strengthening security. With a focus on digital innovation, trade, and cultural ties, PM Modi reaffirmed India’s commitment to regional growth and cooperation.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणाचा अनुवाद
March 12th, 06:07 am
10 वर्षांपूर्वी याच दिवशी मी मॉरिशसला आलो होतो तेव्हा इथे येण्यापूर्वी एकच आठवडा आधी होळी साजरी केली होती. मी इथे येताना भारतातून फागुआचा उत्साह माझ्यासोबत घेऊन आलो होतो. यावेळी मी मॉरिशसमधून होळीचे रंग भारतात घेऊन जाईन. आपण एक दिवसानंतर तिथे होळी साजरी करू. 14 तारखेला चारी दिशांना रंग असतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
March 11th, 07:30 pm
मॉरीशसमधील त्रियानॉन कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगोलम यांच्यासह मॉरीशसमधील भारतीय समुदाय तसेच भारताचे मित्रगण यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींसह समग्र भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. मॉरीशस सरकारमधील अनेक मंत्री, संसद सदस्य तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन
March 06th, 05:30 pm
भारतीय सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जागतिक सहकारी संस्थांबरोबर भागीदारी आवश्यक असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच सहकारी संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला.निर्यात बाजारावर लक्ष केंद्रित करण्याची आणि कृषी पद्धती सुधारण्यासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून मृदा परीक्षण मॉडेल विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली. आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी यूपीआयला रुपे केसीसी कार्डशी जोडण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि सहकारी संस्थांमध्ये निकोप स्पर्धेच्या गरजेवर भर दिला.हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2024 ला केले संबोधित
November 16th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.घोषणा आणि करारांची सूची- मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईझ्झू यांचा भारत दौरा (06 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2024)
October 07th, 03:40 pm
भारत आणि मालदीव्ज: व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठीच्या दृष्टिकोनाबाबत सहमतीभारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन
October 07th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.मालदीवचे राष्ट्रपती एच ई मोहम्मद मुइज्जू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त वक्तव्याचा मजकूर
October 07th, 12:25 pm
दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांतील आमचे सहकारी, सर्वांना नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी रोजी मॉरिशसमधील अगालेगा बेटावर नवीन धावपट्टी आणि जेटीचे संयुक्तपणे करणार उद्घाटन
February 27th, 06:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता दूरदृष्यप्रणालीद्वारे मॉरिशसमधील अगालेगा बेटावर सहा सामुदायिक विकास प्रकल्पांसह नवीन धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत.संयुक्त अरब अमिराती मध्ये अबू धाबी इथे अहलान मोदी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 13th, 11:19 pm
आज अबू धाबी मध्ये आपण सर्वांनी नवा इतिहास घडवला आहे.आपण सर्वजण संयुक्त अरब अमिरातीच्या विविध भागातून आले आहात आणि भारताच्या विविध राज्यांमधून आला आहात.मात्र आपण सर्वजण मनाने जोडलेले आहात.या ऐतिहासिक स्टेडीयममध्ये प्रत्येक जण मनापासून हेच म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद !प्रत्येक श्वासागणिक म्हणत आहे भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! प्रत्येक आवाज म्हणत आहे, भारत- युएई मैत्री झिंदाबाद ! हा एक क्षण अनुभवायचा आहे.भरभरून जगायचा आहे.आपल्या बरोबर आयुष्यभर राहतील अशा आठवणी आज इथून घेऊन जायच्या आहेत.संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदायाच्या "अहलान मोदी" या कार्यक्रमात पंतप्रधानांचा संवाद
February 13th, 08:30 pm
संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित केले. या कार्यक्रमात 7 अमिरातीमधील अनिवासी भारतीय सहभागी झाले होते आणि त्यात सर्व समुदायातील भारतीयांचा समावेश होता. प्रेक्षकांमध्ये अमिराती मधील नागरिकांचाही समावेश होता.Prime Minister’s meeting with President of the UAE
February 13th, 05:33 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Abu Dhabi on an official visit to the UAE. In a special and warm gesture, he was received at the airport by the President of the UAE His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, and thereafter, accorded a ceremonial welcome. The two leaders held one-on-one and delegation level talks. They reviewed the bilateral partnership and discussed new areas of cooperation.