“परीक्षा पे चर्चा 2026” कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद
February 06th, 10:21 am
मी सानवी आचार्य, मी तुमच्याच राज्यातून म्हणजे गुजरातमधील आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की, पालक आमची चिंता करतात आणि शिक्षक देखील आम्हाला मदत करतात. मात्र मुख्य मुद्दा तेव्हा येतो , जेव्हा शिक्षक आम्हाला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सुचवतात. पालक वेगळ्या पद्धतीने सांगतात की या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांमध्ये तर वेगळाच ट्रेंड सुरु असतो, त्यामुळे त्यावेळी आम्ही गोंधळून जातो की कोणती पद्धत बरोबर आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा 2026' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
February 06th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) च्या नवव्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी 'एक्झाम वॉरियर्स'सोबत अनौपचारिक संवाद साधला.विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 च्या समारोपातील पंतप्रधानांचे संबोधन
January 12th, 06:45 pm
जेव्हा 2047मध्ये आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्या टप्प्याकडे जाणारा प्रवास भारतासाठी महत्त्वाचा आहे, आणि तोच कालावधी तुमच्याही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ असेल, म्हणजेच तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुमची ताकद भारताचे ताकद होईल, तुमचे यश, भारताच्या यशाला नव्या शिखरावर घेऊन जाईल. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. या विषयावर मी पुढे सविस्तर चर्चा करेन, पण पहिल्यांदा आजच्या विशेष दिवसाविषयी बोलू या.Prime Minister Shri Narendra Modi addresses the Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026
January 12th, 06:30 pm
In his address at the concluding session of the Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026, PM Modi underscored the critical role of youth leadership in realising the vision of a developed India. He highlighted key reforms and initiatives such as Startup India, Digital India, Ease of Doing Business, and the simplification of tax and compliance, which accelerated India’s startup revolution. The PM encouraged the youth to move forward with confidence, expressing unwavering faith in their potential.नवी दिल्ली येथे वीर बाल दिवस कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे संबोधन
December 26th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रवनीत सिंह, हर्ष मल्होत्रा, दिल्ली सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि माझ्या प्रिय बालकांनो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले
December 26th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 'वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या वंदे मातरम या गीताच्या सुंदर सादरीकरणातून कलाकारांची निष्ठा आणि प्रयत्न ठळकपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.पारंपरिक औषधोपचारावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेतील पंतप्रधानांचे संबोधन
December 19th, 08:11 pm
पारंपरिक औषधोपचार यावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक परिषदेचा आज समापन दिन आहे. गेले तीन दिवस इथे पारंपरिक औषधोपचार क्षेत्राशी संबंधित सांगोपांग आणि महत्वपूर्ण चर्चा झाली. यासंदर्भात एका मजबूत मंचासाठी भारत काम करत आहे याचा मला आनंद आहे आणि यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचीही सक्रीय भूमिका राहिली आहे. या यशस्वी आयोजनासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेचे, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे आणि इथे उपस्थित सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानतो.पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
December 19th, 07:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित केले. या परिषदेत गेल्या तीन दिवसांत पारंपारिक औषध क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यात भारत एक मजबूत व्यासपीठ म्हणून काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या प्रक्रियेत जागतिक आरोग्य संघटनेच्या सक्रिय भूमिकेची दखलपूर्ण नोंदही त्यांनी घेतली. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि उपस्थित सर्व सहभागींचे मनापासून आभारही मानले.पंतप्रधानांच्या हस्ते 2 सप्टेंबरला नवी दिल्लीतील यशोभूमी येथे ‘सेमिकॉन इंडिया - 2025’ चे होणार उद्घाटन
September 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील यशोभूमी इथे भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देण्यासाठी आयोजित ‘सेमिकॉन इंडिया - 2025’ चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून या परिषदेत सहभागी होतील. यात ते सीईओ गोलमेज बैठकीतही भाग घेतील. 2 ते 4 सप्टेंबर या तीन दिवसांच्या परिषदेत भारतात मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाईल. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमातील प्रगती, सेमीकंडक्टर फॅब आणि प्रगत पॅकेजिंग प्रकल्प, पायाभूत सुविधांची तयारी, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यातील नवे शोध, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरणांची अंमलबजावणी यासारख्या विषयांवर सत्रे आयोजित केली जातील. याशिवाय, डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेअंतर्गत उपक्रम, स्टार्टअप परिसंस्थेची वाढ, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भविष्यातला आराखडा यावरही प्रकाश टाकला जाईल. या परिषदेत 20,750 हून अधिक सहभागी उपस्थित राहतील, यामध्ये 48 हून अधिक देशांमधले 2,500 हून अधिक प्रतिनिधी, 50 हून अधिक जागतिक नेत्यांसह 150 हून अधिक वक्ते आणि 350 हून अधिक प्रदर्शकांचा समावेश आहे. याशिवाय, 6 देशांच्या गोलमेज चर्चा, देशांची पॅव्हिलियन्स, तसेच कामगार विकास आणि स्टार्टअप्ससाठी समर्पित विशेष पॅव्हिलियन्स यांचाही समावेश असेल. सेमीकंडक्टर क्षेत्रातील तांत्रिक प्रगती आणि विविध देशांच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला बळकट करण्याच्या धोरणांचा जास्तीत जास्त प्रचार करणे हे जागतिक स्तरावर आयोजित सेमिकॉन परिषदांचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांच्या भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि तंत्रज्ञान विकासाचे केंद्र म्हणून प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, 2022 मध्ये बेंगळुरू, 2023 मध्ये गांधीनगर आणि 2024 मध्ये ग्रेटर नोएडा येथे अशा परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.Be an example; don't demand respect, command respect. Lead by doing, not by demanding: PM Modi on PPC platform
February 10th, 11:30 am
At Pariksha Pe Charcha, PM Modi engaged in a lively chat with students at Sunder Nursery, New Delhi. From tackling exam stress to mastering time, PM Modi shared wisdom on leadership, wellness, and chasing dreams. He praised the youth for their concern about climate change, urging them to take action. Emphasizing resilience, mindfulness, and positivity, he encouraged students to shape a brighter future.यंदाच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
February 10th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप त्यांनी केले.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये दिलेले उत्तर
February 04th, 07:00 pm
आदरणीय राष्ट्रपति जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित आहे. काल आणि आज,काल तर रात्री उशिरापर्यंत सर्व माननीय खासदारांनी आपले विचार मांडून हा आभार प्रस्ताव समृद्ध केला. अनेक माननीय अनुभवी खासदारांनीही आपले विचार व्यक्त केले आणि हे स्वाभाविक आहे, लोकशाहीची परंपराही आहे, जिथे आवश्यक होते तिथे प्रशंसा झाली, जिथे व्यथा जाणवली तिथे काही नकारात्मक गोष्टीही मांडल्या गेल्या आणि हे अतिशय स्वाभाविक आहे ! अध्यक्ष जी माझे मोठे भाग्य आहे की देशातल्या जनतेने मला या स्थानावर बसून राष्ट्रपती जी यांच्या संबोधनाबाबत आभार व्यक्त करण्याची 14 वेळा संधी दिली आणि म्हणूनच आज जनता जनार्दनाचेही अतिशय आदराने मी आभार मानतो आणि सदनातल्या चर्चेत जे-जे सदस्य सहभागी झाले,चर्चा समृद्ध केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत निवेदन
February 04th, 06:55 pm
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन केले. काल आणि आज झालेल्या चर्चेत सहभागी झालेल्या संसद सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. लोकशाहीच्या परंपरेत जिथे आवश्यकता आहे तिथे कौतुकाची थाप आणि गरज असेल तिथे काही कानपिचक्या देणारी वक्तव्ये चर्चेत येणे साहजिक असल्याचे पंतप्रधान भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शनाची संधी जनतेने चौदाव्यांदा देणे हा मी माझा सन्मान समजतो असे सांगून त्यांनी नागरिकांचेही आभार मानले आणि चर्चेत सहभागी झालेल्यांनी त्यांच्या विचारांनी आभारप्रस्तावाला नवी उंची गाठून दिली अशी टिप्पणी त्यांनी केली.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
December 11th, 05:00 pm
मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील सहभागींशी साधला संवाद
December 11th, 04:30 pm
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या 'सबका प्रयास' या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार
October 08th, 07:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीतील सहभागींसोबत झालेल्या संवादात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
December 19th, 11:32 pm
खरेच तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटले . देशासमोरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातील तरुण पिढी अहोरात्र काम करत आहे ,याचा मला आनंद आहे. आधीच्या हॅकॅथॉनमधून मिळालेले उपाय खूप प्रभावी ठरले आहेत. हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअपही सुरू केले आहेत. हे स्टार्टअप्स, हे उपाय सरकार आणि समाज दोघांनाही मदत करत आहेत. आज या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे.