India is not just progressing, India is moving to the Next: PM Modi
March 12th, 10:47 pm
In his address at the NXT Summit, PM Modi emphasized that just as the 1930 Dandi march unified the country in the pursuit of freedom, the current Viksit Bharat mission is the collective goal of 140 crore Indians. He highlighted the positive statements made by global leaders such as Mark Carney and Emmanuel Macron about India. Remarking on the ongoing discussions surrounding LPG, the PM called upon citizens to prioritize facts over misinformation.PM Modi addresses the NXT Summit
March 12th, 08:30 pm
In his address at the NXT Summit, PM Modi emphasized that just as the 1930 Dandi march unified the country in the pursuit of freedom, the current Viksit Bharat mission is the collective goal of 140 crore Indians. He highlighted the positive statements made by global leaders such as Mark Carney and Emmanuel Macron about India. Remarking on the ongoing discussions surrounding LPG, the PM called upon citizens to prioritize facts over misinformation.The strong foundation of Viksit Rajasthan is giving more strength to the resolution of Viksit Bharat: PM Modi
March 07th, 03:15 pm
PM Modi addressed the foundation stone-laying ceremony of the Kota Airport, calling it a day of new hope for Kota. He remarked that enhanced air connectivity would bring global tourists to the region, benefiting people. Listing the major infrastructure progress around the Kota region, he lauded Kota MP and Lok Sabha Speaker Om Birla for his dedication to the region’s development and his role in Parliament.PM Modi lays Foundation Stone of Kota Airport; Highlights transformation of Hadoti Region
March 07th, 02:45 pm
PM Modi addressed the foundation stone-laying ceremony of the Kota Airport, calling it a day of new hope for Kota. He remarked that enhanced air connectivity would bring global tourists to the region, benefiting people. Listing the major infrastructure progress around the Kota region, he lauded Kota MP and Lok Sabha Speaker Om Birla for his dedication to the region’s development and his role in Parliament.The HPV vaccination campaign, launched from Ajmer, marks a significant step towards empowering the nation’s Nari Shakti: PM Modi in Rajasthan
February 28th, 12:00 pm
At a public gathering in Ajmer, PM Modi expressed satisfaction that the “double-engine government” in Rajasthan has completed two years of rapid progress. He launched projects worth approximately ₹17,000 crore and handed over appointment letters to youth. The PM also launched the nationwide HPV vaccination campaign, describing it as a pivotal step toward empowering India’s ‘Nari Shakti’ (women power) and ensuring the health of mothers and daughters.PM Modi launches Nationwide HPV Vaccination Campaign and Development Projects Worth ₹17,000 Crore in Ajmer, Rajasthan
February 28th, 11:30 am
At a public gathering in Ajmer, PM Modi expressed satisfaction that the “double-engine government” in Rajasthan has completed two years of rapid progress. He launched projects worth approximately ₹17,000 crore and handed over appointment letters to youth. The PM also launched the nationwide HPV vaccination campaign, describing it as a pivotal step toward empowering India’s ‘Nari Shakti’ (women power) and ensuring the health of mothers and daughters.Prime Minister Narendra Modi to visit Rajasthan
February 27th, 03:35 pm
PM Modi will visit Ajmer, Rajasthan on 28 February 2026 and launch projects worth over ₹16,680 crore. Aiming to prevent cervical cancer, the PM will launch a nationwide campaign for HPV vaccination for girls aged 14 years. During the visit, he will distribute more than 21,800 appointment letters to newly recruited youth in various Government departments and organisations in Rajasthan.Congress wants to push Assam back into instability and infiltration: PM Modi in Guwahati
February 14th, 03:00 pm
PM Modi addressed a massive public rally in Guwahati, where he said the recent Union Budget has further strengthened the vision of the BJP-NDA for the development of Assam and the North East. Calling the North East “Ashtalakshmi,” he said the region was ignored for decades by Congress but is now being served with dedication.PM Modi addresses a grand public rally in Guwahati, Assam
February 14th, 02:30 pm
PM Modi addressed a massive public rally in Guwahati, where he said the recent Union Budget has further strengthened the vision of the BJP-NDA for the development of Assam and the North East. Calling the North East “Ashtalakshmi,” he said the region was ignored for decades by Congress but is now being served with dedication.ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे इंग्रजी भाषांतर
February 13th, 08:30 pm
आपल्या सर्वांचे या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण येथे “ए डिकेड ऑफ डिसरप्शन, ए सेंच्युरी ऑफ चेंज” या विषयावर चर्चा करत आहोत. विनीतजींचे भाषण ऐकल्यानंतर मला वाटते की, माझे काम खूप सोपे झाले आहे. मात्र एक छोटीशी विनंती करतो, आपल्याला इतके सगळे माहीत आहे, तर कधीतरी इटी मध्येही ते दिसायला हवे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला केले संबोधित
February 13th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना, पंतप्रधानांनी जागतिक व्यापार शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले आणि 'संकटांचे दशक, बदलाचे शतक' या संकल्पनेवर आपले विचार मांडले. 21 व्या शतकातील गेल्या दशकात अभूतपूर्व संकटे आली, ज्यात जागतिक महामारी, वेगवेगळ्या भागांमध्ये तणाव आणि युद्धे आणि जागतिक संतुलन बिघडवणारे पुरवठा साखळीतील बिघाड यांचा समावेश आहे, यावर त्यांनी भर दिला. संकट काळातच देशाचे सामर्थ्य समोर येते असे सांगून या अडथळ्यांना न जुमानता, भारताचे दशक उल्लेखनीय विकास, उत्कृष्ट कामगिरी आणि लोकशाहीच्या बळकट करणारे ठरले याबद्दल अभिमान व्यक्त केला.राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर
February 05th, 05:35 pm
विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात मागील वर्ष जलद प्रगती आणि विकासाचे वर्ष राहिले आहे. हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी परिवर्तनाचा कालखंड राहिला आहे. देश योग्य दिशेने जलद गतीने पुढे जात आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अतिशय उत्तम पद्धतीने , अतिशय संवेदनशीलतेने हे विषय आपल्यासमोर मांडले आहेत .राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर
February 05th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात विकसित भारताच्या प्रवासात वेगाने प्रगती झाली आहे, प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये परिवर्तन झालेले दिसून येत असून देश योग्य दिशेने वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रपतींनी हे विषय अतिशय संवेदनशीलतेने आणि स्पष्टपणे मांडले आहेत असे मोदी यांनी अधोरेखित केले.पश्चिम बंगालमधील मालदा येथील विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 17th, 02:00 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस जी; केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, शांतनू ठाकूर जी, सुकांत मजुमदार जी; पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी जी; संसदेतील माझे सहकारी शामिक भट्टाचार्य जी, खगेन मुर्मू जी, कार्तिक चंद्र पॉल जी; उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि सज्जनहो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली
January 17th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 3,250 कोटी रुपयांच्या अनेक रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. याचा उद्देश पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील प्रदेशातील संचारसंपर्क मजबूत करणे तसेच विकासाला गती देणे हा आहे. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज मालदा येथून पश्चिम बंगालच्या प्रगतीला गती देण्याच्या मोहिमेला आणखी वेग आला आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे नुकतेच उद्घाटन करून ते राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, पश्चिम बंगालसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प लोकांचा प्रवास सुलभ करतील, तसेच व्यापार आणि वाणिज्य सुलभ करतील. त्यांनी यावर जोर दिला की, येथे स्थापन करण्यात आलेल्या नवीन रेल्वे देखभाल सुविधांमुळे बंगालच्या तरुणांना नवीन संधी उपलब्ध होतील.केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या 374 किमी लांबीच्या सहा पदरी ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी, बांधा वापरा हस्तांतरित करा(टोल) तत्वावरील या प्रकल्पाची 19,142 कोटी रुपये खर्चाने होणार उभारणी
December 31st, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 किमी. लांबीच्या 6-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा (टोल) या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नकाशात दर्शविल्याप्रमाणे, हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना जोडत पुढे कुर्नुलला संपर्कव्यवस्था प्रदान करेल. ही पायाभूत सुविधा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद् आराखड्याच्या तत्त्वांतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 21st, 04:25 pm
ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी
December 21st, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड मधील नामरूप इथे आसाम व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी लिमिटेडच्या वतीने उभारल्या जात असलेल्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाची पायाभरणी झाली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. ही भूमी चाओलंग सुखाफा आणि महावीर लाचित बोरफुकन यांसारख्या महान वीरांची भूमी असल्याचे त्यांनी नमूद केले. भीमबर देउरी, शहीद कुशल कुंवर, मोरान राजा बौदोसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंग आणि पराक्रमी सती साधनी यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या शौर्य आणि बलिदानाच्या महान भूमीला, उजनी आसामच्या पवित्र मातीला आपण नमन करत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 20th, 03:20 pm
आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी आपल्या सर्वाना एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन' केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश सुरू करावा आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन
December 20th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.