पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर

December 12th, 02:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते दुपारी 12.15 च्या सुमाराला संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणाची पाहणी करतील. पंतप्रधान त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास प्रयागराज येथे 5500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील.