पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्किम@50 समारंभामध्‍ये केलेले भाषण

May 29th, 10:00 am

आजचा दिवस विशेष आहे; हा दिवस सिक्किमच्या लोकशाही प्रवासाच्या सुवर्ण महोत्सवाचा आहे. आपल्या सर्वांसोबत उपस्थित राहून या उत्सवाचा, या आनंदाचा, 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा साक्षीदार होण्‍याची माी इच्छा होती. मलाही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या उत्सवाचा भाग व्हायचे होते. मी पहाटे पहाटे दिल्लीहून लवकर निघून, बागडोगराला तर पोहोचलो, मला आपल्या दारापर्यंत पोहोचता आले, पुढे मात्र खराब हवामानामुळे जाऊ शकलो नाही. त्यामुळे आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. पण, मी हे दृश्य पहात आहे…. असे भव्य दृश्य माझ्यासमोर आहे…. समोर लोकांची गर्दी दिसत आहे, किती सुंदर दृश्य आहे! किती छान झाले असते, मी ही आपल्या सोबत असतो, पण मी पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. पण, मुख्यमंत्रीजींनी मला निमंत्रण दिलं आहे, मी आपल्याला विश्वास देतो, राज्य सरकार जेव्हा ठरवेल, तेव्हा मी सिक्किमला नक्की येईन, आपल्याला भेटेन आणि या 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा मीही साक्षीदार होईन. आजचा दिवस मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा करण्याचा आहे आणि आपण उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्रीजींनी या कार्यक्रमाला संस्मरणीय बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. दिल्लीमध्येही त्यांनी दोन वेळा येऊन मला निमंत्रण दिले. मी सर्वांना सिक्किम राज्य स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिक्कीम@50’ सोहोळ्याला संबोधित केले

May 29th, 09:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गँगटोक येथे आयोजित ‘सिक्कीम@50’ कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. ‘उद्देशासह प्रगती आणि निसर्गातून वृद्धीची जोपासना’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सिक्कीम राज्यस्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या विशेष प्रसंगी सिक्कीमच्या जनतेला अभिवादन केले. ते म्हणाले की त्यांना स्वतःला या प्रसंगी उपस्थित राहून सिक्कीमच्या जनतेचा उत्साह, उर्जा आणि उत्सुकता अनुभवायची होती मात्र प्रतिकूल हवामानामुळे ते तेथे हजार राहू शकले नाहीत. नजीकच्या भविष्यात सिक्कीमला भेट देण्याचे आणि तेथील लोकांची यशस्वी कामगिरी तसेच सोहळे यांचा भाग होण्याचे वचन त्यांनी तेथील जनतेला दिले. आजचा दिवस सिक्कीममधील लोकांनी गेल्या 50 वर्षात केलेल्या सफल कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे असे सांगून त्यांनी हा भव्य सोहोळा संस्मरणीय पद्धतीने आयोजित केल्याबद्दल सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. सिक्कीम राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन सोहोळ्याच्या प्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा तेथील जनतेचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

May 25th, 11:30 am

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'

रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

May 23rd, 11:00 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन

May 23rd, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

Prime Minister Narendra Modi to inaugurate Rising North East Investors Summit in New Delhi

May 22nd, 04:13 pm

PM Modi will inaugurate the Rising North East Investors Summit on May 23 at Bharat Mandapam, New Delhi. The two-day summit will bring together investors, policymakers, and key stakeholders to explore investment opportunities across key sectors in the North Eastern Region.