न्यूज 18 रायझिंग भारत समिटमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 27th, 08:30 pm
आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण
February 27th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्ट्रेंथ विदीन या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण
April 08th, 08:30 pm
या शिखर परिषदेद्वारे तुम्ही मला देश आणि जगभरातील आदरणीय पाहुण्यांशी तसेच तुमच्या प्रेक्षकांशी जोडण्याची संधी दिल्याबद्दल मी नेटवर्क 18 चे आभार मानतो. तुम्ही या वर्षीच्या शिखर परिषदेला भारताच्या तरुणांच्या आकांक्षांशी जोडले आहे, याचा मला आनंद आहे. या वर्षीच्या सुरुवातीला, विवेकानंद जयंतीला, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग येथेच भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, मला तरुणांच्या डोळ्यात स्वप्नांची चमक, त्यांच्या दृढनिश्चयाची ताकद आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची त्यांचा ध्यास दिसला. जर आपण 2047 पर्यंत भारताला कोणत्या उंचीवर नेण्याची आपली आकांक्षा आहे आणि आपण ज्या पथदर्शीचे अनुसरण करत आहोत त्याचा विचार जर आपण प्रत्येक पावलागणिक करत राहिलो तर 'अमृत' नक्कीच उदयास येईल. आणि हे 'अमृत' 'अमृत काल' च्या पिढीला ऊर्जा आणि दिशा तसेच भारताला गती प्रदान करेल. मी या शिखर परिषदेबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 रायझिंग भारत शिखर परिषदेला केले संबोधित
April 08th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि जगभरातील आदरणीय अतिथींशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी नेटवर्क18 चे आभार मानले. या वर्षीची शिखर परिषद भारताच्या युवकांच्या आकांक्षांवर केंद्रित असल्याचे त्यांनी कौतुक केले. या वर्षीच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित 'विकसित भारत युवा नेता संवाद 'चे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची स्वप्ने , दृढनिश्चय आणि आवड यांचा उल्लेख केला. त्यांनी 2047 पर्यंत भारताच्या प्रगतीच्या रुपरेषेबाबतवर भर देत सांगितले की प्रत्येक टप्प्यावर निरंतर विचारमंथन केल्याने मौल्यवान विचार अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. ही माहिती अमृत काळातील पिढीला ऊर्जा देईल , मार्गदर्शन करेल आणि गतिमान करेल असे त्यांनी नमूद केले. त्यांनी शिखर परिषदेच्या यशासाठी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.