पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला केले संबोधित
July 07th, 11:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिक्स शिखर परिषदेतील पर्यावरण, कॉप 30 आणि जागतिक आरोग्य या विषयावरील सत्राला संबोधित केले. या सत्राला ब्रिक्स समूहातील सदस्य देश, भागीदार राष्ट्र आणि आमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या विषयांवर अधिवेशन आयोजित केल्याबद्दल त्यांनी ब्राझीलचे आभार मानले. भारतासाठी हवामान बदल हा केवळ ऊर्जेशी निगडित प्रश्न नसून जीवन आणि निसर्ग यांच्यातील समतोलावर परिणाम करणारा प्रश्न आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हवामान न्याय या मुद्द्याकडे भारत नैतिक जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत असून ती पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. हवामानाशी सुसंगत कृतीसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असून त्यादिशेने नागरिक आणि आपल्या वसुंधरेच्या समृद्धी आणि विकासाकरता भारत, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैवइंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स, मिशन लाईफ, एक पेड माँ के नाम इत्यादी उपक्रम राबवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.ब्रिक्स सत्रात पर्यावरण, सीपीओ-30 आणि जागतिक आरोग्य विषयावर पंतप्रधानांचे निवेदन
July 07th, 11:13 pm
मला आनंद आहे की ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सने (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना उच्च प्राधान्य दिले आहे. हे विषय केवळ परस्पर संबंधित नाहीत, तर मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
July 07th, 09:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर उरुग्वेचे अध्यक्ष महामहिम यामांडू ओरसी यांची भेट घेतली.ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने रिओ दी जानेरो येथे पंतप्रधानांनी बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
July 07th, 09:19 pm
ब्राझीलमध्ये रिओ दी जानिरो येथे आयोजित ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष लुईस आर्से कॅटाकोरा यांची भेट घेतली.Rio de Janeiro Declaration- Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance
July 07th, 06:00 am
The leaders of BRICS countries, met in Rio de Janeiro, Brazil for the 17th BRICS Summit. The leaders reaffirmed their commitment to the BRICS spirit of mutual respect and understanding, sovereign equality, solidarity, democracy, openness, inclusiveness, collaboration and consensus. They strongly condemned terrorism and welcomed the inclusion of new countries as BRICS partner countries.ब्रिक्समध्ये पार पडलेल्या शांतता आणि सुरक्षा यांवरील सत्रामधील पंतप्रधानांचे संबोधन
July 06th, 11:07 pm
जागतिक शांतता आणि सुरक्षा हे केवळ आदर्श नव्हेत, तर ते आपल्या सामाईक हितसंबंध आणि भविष्य यांचा पाया आहेत. मानवतेची प्रगती केवळ शांततामय आणि सुरक्षित वातावरणातच शक्य आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यामध्ये ब्रिक्स खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते.आपण एकत्र येत, आपले एकत्रित प्रयत्न आणि आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण एकत्रितपणे पुढे गेले पाहिजे.PM Modi’s remarks during the BRICS session: ‘Peace and Security and Reform of Global Governance’
July 06th, 09:41 pm
PM Modi underscored how the Global South has long been sidelined—offered mere “token gestures” on crucial issues like climate finance, sustainable development, technology access, and security—while lacking genuine representation in key global institutions. He praised the expansion of BRICS under Brazil’s leadership, called for genuine reforms in bodies like the UN Security Council, WTO, and development banks, and emphasized the need for a modern, inclusive world order fit for the 21st century.The diversity and multipolarity of the BRICS Group is our greatest strength: PM Modi
July 06th, 09:40 pm
PM Modi participated in the 17th BRICS Summit held in Rio de Janeiro, Brazil and addressed two sessions. Highlighting that the global organizations of the 20th century lacked the capacity to deal with the challenges of the 21st century, the PM underscored the need for reforming them. He offered his suggestions on BRICS New Development Bank, Science and Research repository, critical minerals and AI.ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
July 06th, 09:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6-7 जुलै 2025 ला ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला.जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी फलदायी चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी जिव्हाळ्याने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.ब्राझीलमधील भारतीयांनी केलेल्या ह्रदय स्वागताबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
July 06th, 08:28 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ दि जानेरो येथे त्यांचे मनापासून स्वागत केल्याबद्दल ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, हे पाहून आश्चर्य वाटते की ते भारतीय संस्कृतीशी किती घट्ट जोडलेले आहेत आणि भारताच्या प्रगतीबाबत किती उत्कटतेने कार्यरत आहेत.पंतप्रधान मोदींचे ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरो येथे आगमन
July 06th, 04:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही वेळापूर्वी ब्राझीलमध्ये आगमन झाले. ते रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहणार असून तिथे अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतील.दुसरी भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद
November 20th, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी 19 नोव्हेंबर रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या जी20 शिखर परिषदेला अनुषंगून दुसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भेट घेतली. पहिली वार्षिक शिखर परिषद 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान अल्बनीज यांच्या भारताच्या राजकीय दौऱ्यादरम्यान झाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली चिलीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
November 20th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. ही त्यांची पहिली भेट होती.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देऊन भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे : पंतप्रधान
November 20th, 05:02 am
आपण राहतो तो ग्रह निरोगी असेल तरच तो चांगला ग्रह आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला मोठे प्राधान्य देत आहे. यावेळी त्यांनी हे देखील नमूद केले की भारत या संदर्भात सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणावरील जी 20 सत्रातील पंतप्रधानांचे भाषण
November 20th, 01:40 am
आजच्या सत्राची संकल्पना अतिशय प्रासंगिक आहे आणि भावी पिढीच्या भविष्याशी निगडित आहे. नवी दिल्ली जी -20 शिखर परिषदेदरम्यान, आपण शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देण्यासाठी वाराणसी कृती आराखडा स्वीकारला होता.पंतप्रधानांनी शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित जी20 सत्राला संबोधित केले
November 20th, 01:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी20 शिखर परिषदेतील शाश्वत विकास आणि उर्जा स्थित्यंतरावर आधारित सत्राला संबोधित केले. नवी दिल्ली येथे आयोजित जी 20 शिखर परिषदेदरम्यान या गटाने वर्ष 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा क्षमता तिप्पट करण्याचा आणि उर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करण्याचा संकल्प केला होता याचा त्यांनी उल्लेख केला. या शाश्वत विकासविषयक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या ब्राझीलच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.इटली-भारत संयुक्त सामरिक कृती योजना 2025-2029
November 19th, 09:25 am
भारत-इटली सामरिक भागीदारीचे अतुलनीय महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्राझीलमध्ये रिओ-दि-जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेतील 18 नोव्हेंबर 2024 च्या बैठकीदरम्यान, तिला अधिक गती देण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुढीलप्रमाणे लक्ष्यकेंद्री आणि कालबद्ध उपक्रम आणि सामरिक कृतीची संयुक्त योजना आखण्यात आली आहे. या दिशेने, इटली आणि भारत या देशांनी पुढील गोष्टींना मान्यता दिली आहे:पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 08:34 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.