पंतप्रधान 3 नोव्हेंबर रोजी उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 चे करणार उद्घाटन
November 02nd, 09:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचे (ईएसटीआयसी) 2025 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.धोरणात्मक आणि उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधन, विकास व नवोन्मेष योजनेला केंद्रिय मंत्रीमंडळाची मंजूरी
July 01st, 04:59 pm
भारताच्या संशोधन व नवोन्मेष परिसंस्थेला बळ देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रीमंडळाने आज एकंदर एक लाख कोटी रुपये खर्चाच्या संशोधन विकास व नवोन्मेष (आरडीआय) योजनेला मंजूरी दिली.