स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 27th, 11:01 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, जी. किशन रेड्डीजी, आंध्र प्रदेशचे उद्योग मंत्री, टी.जी. भरतजी, इन-स्पेसचे अध्यक्ष, पवन गोएंकाजी, टीम स्कायरूट, इतर मान्यवर, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी भर दिला. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे यावर भर देत त्यांनी अधोरेखित केले की देशातील नवोन्मेष , युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येईल याचे प्रतिबिंब म्हणजे आजचा कार्यक्रम आहे असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांना शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की हे दोन्ही युवा उद्योजक देशभरातील असंख्य तरुण अंतराळ उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. दोघांनीही स्वतःवर विश्वास ठेवला, जोखीम घेण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि परिणामी आज संपूर्ण देश त्यांचे यश पाहत आहे आणि देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे यावर त्यांनी भर दिला .वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या 2277.397 कोटी रुपयांच्या खर्चाच्या "क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास" या योजनेला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी
September 24th, 05:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी एकूण 2277.397 कोटी रुपयांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग / वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (DSIR/CSIR) क्षमता बांधणी आणि मानव संसाधन विकास या विषयावरील योजनेला मान्यता देण्यात आली आहे.भारत सिंगापूर संयुक्त निवेदन
September 04th, 08:04 pm
सिंगापूरचे पंतप्रधान मा. लॉरेन्स वाँग यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने, भारत आणि सिंगापूर यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारीसाठीच्या कार्ययोजना (रोडमॅप) विषयक संयुक्त निवेदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन
September 04th, 12:45 pm
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान वोंग यांच्या पहिल्या भारत भेटीचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ही भेट आणखी खास आहे कारण यावर्षी आम्ही द्विपक्षीय संबंधांचा साठावा वर्धापनदिन साजरा करत आहोत.इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
August 23rd, 10:10 pm
येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित
August 23rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वाययुजीएम (युग्म) बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 29th, 11:01 am
आज येथे सरकार, शिक्षण क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विविध क्षेत्रातील मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही एकजूट, हे ऐक्य, यालाच युग्म असे म्हणतात. हे एक असे युग्म आहे ज्यामध्ये विकसित भारताच्या भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित भागधारक एकत्र आले आहेत, एकजूट झाले आहेत. भारताची नवोन्मेष क्षमता आणि गहन-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे आणखी बळकटी मिळेल असा विश्वास मला वाटतो. आज आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई या संस्थांमध्ये कृत्रिम प्रज्ञा , गुप्तहेर यंत्रणा आणि जैवविज्ञान, जैव तंत्रज्ञान तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सेवा यांच्याशी संबंधित सुपर हब्सची सुरुवात होत आहे. आज वाधवानी नवोन्मेष नेटवर्कची देखील सुरुवात झाली आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसोबत मिळून संशोधनाला चालना देण्याचा देखील निर्धार करण्यात आला आहे. या प्रयत्नासाठी वाधवानी प्रतिष्ठानचे, आमच्या आयआयटी संस्थांचे, आणि इतर सर्व भागधारकांचे मी अभिनंदन करतो. तुमची समर्पणवृत्ती आणि सक्रियतेमुळे खासगी आणि सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युग्म’ नवोन्मेष परिषदेला केले संबोधित
April 29th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित युग्म नवोन्मेष परिषदेला संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि संशोधन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यावर प्रकाश टाकला आणि युग्म - विकसित भारतासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशाने एक सहकार्य - म्हणून हितधारकांच्या मिलाफावर भर दिला. या कार्यक्रमाद्वारे भारताची नाविन्यपूर्ण क्षमता आणि सखोल तंत्रज्ञानातील त्याची भूमिका वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई येथे कृत्रिम प्रज्ञा , सक्षम प्रणाली आणि जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुपर हबच्या उदघाटनाचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहयोगातून संशोधनाला चालना देण्याच्या बांधिलकीला दुजोरा देणाऱ्या वाधवानी नवोन्मेष नेटवर्कच्या उदघाटनाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी वाधवानी प्रतिष्ठान, आयआयटी आणि या उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाद्वारे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल त्यांनी रोमेश वाधवानी यांचे विशेष कौतुक केले.उत्कर्ष ओदिशा - मेक इन इंडिया कॉनक्लेव्हमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
January 28th, 11:30 am
जानेवारी महिन्यात, म्हणजे 2025 च्या सुरुवातीलाच माझा ओदिशाचा हा दुसरा दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मी इथे झालेल्या अनिवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आज आता उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्हमध्ये मी तुमच्या सोबत आलो आहे. मला सांगण्यात आले आहे की ओदिशामध्ये आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यवसायविषयक शिखर परिषद आहे. पूर्वीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने अधिक गुंतवणूकदार यात सहभागी होत आहेत. ओदिशाच्या जनतेचे, ओदिशा सरकारचे या अप्रतिम कार्यक्रमासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वरमध्ये केले “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन
January 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओदिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओदिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओदिशाची जनता आणि ओदिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.अटल इनोव्हेशन मिशन सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 25th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाच्या अखत्यारीतील अटल इनोव्हेशन मिशन (AIM) या प्रमुख उपक्रमाला कामाच्या वाढीव व्याप्तीसह आणि 2,750 कोटी रुपये तरतुदीसह 31 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट
November 19th, 05:41 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.करारांची यादी – 7व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी जर्मनीच्या चॅन्सेलरचा भारत दौरा
October 25th, 04:50 pm
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायदेविषयक परस्पर सहाय्य करार (एमएलएटी)Today India is working in every sector, in every area with unprecedented speed: PM at NDTV World Summit
October 21st, 10:25 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.Prime Minister Shri Narendra Modi addresses NDTV World Summit 2024 in New Delhi
October 21st, 10:16 am
Prime Minister Narendra Modi addressed the NDTV World Summit 2024. “Today, India is working in every sector and area with unprecedented speed”, the Prime Minister said. Noting the completion of 125 days of the third term of the government, PM Modi threw light on the work done in the country.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 मध्ये आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्यांच्या सीईओंनी भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची केली प्रशंसा
September 11th, 04:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. सेमीकॉन इंडिया 2024 चे 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘सेमीकंडक्टरच्या भविष्याला आकार देणे ’ अशी यंदाची संकल्पना आहे. आहे. तीन दिवसीय परिषद भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित करते, ज्यामागे भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे. जगभरातील आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्या या परिषदेत सहभागी होत आहेत . ही परिषद जागतिक नेते, कंपन्या आणि सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ञांना एकत्र आणेल. या परिषदेत 250 हून अधिक प्रदर्शक आणि 150 वक्ते सहभागी होत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीचे भूषवले अध्यक्षस्थान
September 10th, 04:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी झाली. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राविषयी तसेच संशोधन आणि विकास कार्यक्रमांची पुनर्रचना करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 03rd, 09:35 am
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीती