India is not only a fast-growing economy, but also a credible one: PM Modi
June 22nd, 10:24 pm
Addressing the Republic Summit 2026, PM Modi highlighted how the spirit of “Nation First” has guided India’s achievements over the past decade. He said India is emerging as a fast-growing, credible and reliable global power and noted that Left Wing Extremism is breathing its last amid rapid development. He expressed confidence that the collective efforts of 140 crore Indians will realise the vision of a Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक शिखर परिषद 2026 ला केले संबोधित
June 22nd, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रिपब्लिक शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेतील सहभागींना अभिवादन करत, पंतप्रधानांनी जग वेगवान आणि महत्त्वपूर्ण घडामोडींचे साक्षीदार ठरत असतानाच्या काळात, “महान शक्ती भारत: राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित चर्चेचे यजमानपद भूषवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.हैदराबाद येथील विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 03:45 pm
तेलंगणाचे राज्यपाल श्रीमान शिव प्रताप शुक्ला जी, राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान रेवंत रेड्डी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी, बंडी संजय कुमार, संसदेतील माझे सहकारी कोंडा विश्वेश्वर रेड्डी जी, तेलंगणा सरकारचे मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, आणि उपस्थित मान्यवर!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण
May 10th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद इथे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी हैदराबाद हे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून त्याचे परिवर्तनाच्यादृष्टीने असलेले महत्व अधोरेखित केले. तेलंगणा आणि संपूर्ण राष्ट्राच्या जलद गतीने होत असलेल्या विकासाला गती देण्याती हा प्रदेश बजावत असलेली महत्वाची भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. आज सुरू करण्यात आलेल्या मोठ्या स्तरावरील अनेक प्रकल्पांमुळे तेलंगण एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रस्थापित होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक स्तरावरच्या संपर्क व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदनही केले.सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 13th, 06:55 pm
केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 13th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
February 01st, 01:38 pm
आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया
February 01st, 01:00 pm
आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य माध्यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात देशातील सक्षम महिलांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आहे, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.आव्हानात्मक जागतिक वातावरणात देशाची स्थिर प्रगती दर्शवणारे आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’ असल्याचे पंतप्रधानांनी केले अधोरेखित
January 29th, 08:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाने भारताच्या 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’ सादर केले आहे. आव्हानात्मक जागतिक वातावरणातही देशाची स्थिर प्रगती या सर्व्हेक्षणातून दिसून येते. पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, आर्थिक सर्व्हेक्षण मजबूत समग्र आर्थिक मूलभूत तत्त्वे, शाश्वत वाढीची गती आणि राष्ट्र उभारणीमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका अधोरेखित करते. हे सर्वेक्षण सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करते, त्यामध्ये शेतकरी, एमएसएमई, युवा रोजगार आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. हे उत्पादन मजबूत करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विकसित भारत बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करण्यासाठीचा आराखडा देखील मांडते, असे मोदी म्हणाले.राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आरंभ : पंतप्रधान
January 28th, 11:00 am
आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला आज दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. मोदी म्हणाले की, आजचे भाषण सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीचे होते. त्यात अलीकडच्या काळातील भारताच्या उल्लेखनीय विकास प्रवासाचे प्रतिबिंब दिसले, तसेच भविष्यासाठी एक स्पष्ट दिशाही दर्शवण्यात आली.रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 24th, 11:30 am
सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान
January 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.समृद्ध भारतासाठीच्या व्यापक सुधारणा पंतप्रधानांनी केल्या अधोरेखीत
January 07th, 10:00 pm
सरकारच्या गुंतवणुकीला मोठी चालना देणाऱ्या तसेच मागणीवर आधारित व्यापक धोरणांमुळे भारताची रिफॉर्म एक्सप्रेस अर्थात सुधारणांची एक्सप्रेस वेग जारी राखत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखीत केली आहे.