युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
December 08th, 08:53 pm
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. जगभरातील जागत्या परंपरांना संरक्षित आणि लोकप्रिय करण्याचा सामायिक दृष्टिकोन असणारे जवळपास 150 हून जास्त देशांमधले प्रतिनिधी या चर्चासत्राला आले आहेत असे त्यांनी सांगितले.उडुपी येथील श्रीकृष्ण मठातील लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 28th, 11:45 am
मी माझे भाषण सुरु करण्यापूर्वी — इथे काही मुलं चित्र काढून घेऊन आली आहेत. SPG चे लोक आणि स्थानिक पोलिस थोडी मदत करतील का, ती चित्रं गोळा करण्यासाठी? जर तुम्ही त्याच्या मागे तुमचा पत्ता लिहिला असेल, तर मी नक्कीच तुम्हाला आभारपत्र पाठवेन. ज्यांनी जे काही आणले असेल, ते देऊन टाका, ते गोळा करतील आणि मग तुम्ही निवांत बसू शकता. ही मुले इतकी मेहनत करतात, आणि कधी कधी, मीच त्यांच्या बाबतीत अन्याय करतो असं वाटतं, तेव्हा मला खूप वाईट वाटतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला केले संबोधित
November 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने केला ठराव संमत
November 12th, 08:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत दि. 10 नोव्हेंबर 2025, संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार स्फोटाच्या दहशतवादी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला गेला. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली म्हणून मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन राखले.नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 31st, 07:00 pm
सर्वप्रथम, मला यायला विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज सरदार साहेबांची 150 वी जयंती आहे. एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्याचा विशेष कार्यक्रम होता, त्यामुळे मला उशीर झाला आणि मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी इथे आलो, त्यावेळी जे मंत्र ऐकले होते, त्यांची ऊर्जा आपल्याला आताही जाणवत आहे. जेव्हा जेव्हा मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळते, आणि जेव्हा जेव्हा मी येतो, तेव्हा तो एक दिव्य अनुभव असतो, एक अद्भुत अनुभव असतो. आणि हा स्वामी दयानंदजींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या आदर्शांबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, तुम्हा सर्व विचारवंतांशी माझी अनेक दशकांची जवळीक आहे, त्यामुळे मला तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो, तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि मला नुकतेच सांगण्यात आले की अशी आणखी नऊ सभागृहे बांधण्यात आली आहेत. तेथे आपले सर्व आर्य समाज सदस्य हा कार्यक्रम व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पाहत आहेत. मी त्यांना पाहू शकत नाही, पण मी इथूनच त्यांना प्रमाण करतो.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
October 31st, 09:00 am
सरदार पटेल यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीच्या या ऐतिहासिक दिवशी, एकता नगरची ही दिव्य प्रभात , हे विहंगम दृश्य, सरदार साहेबांच्या चरणांशी आमची उपस्थिती, आज आपण सर्व जण एका महान क्षणाचे साक्षीदार आहोत. देशभरात आयोजित एकता दौड, रन फॉर युनिटी , कोट्यवधी भारतीयांचा उत्साह, नूतन भारताच्या संकल्पशक्तीचा आपणा सर्वाना साक्षात्कार होतो आहे. नुकतेच इथे जे कार्यक्रम झाले, काल संध्याकाळी जे अद्भुत सादरीकरण झाले, त्यांच्यातही भूतकाळातील परंपरा होती, वर्तमानातील श्रम व शौर्य होते, आणि भविष्यकाळातील सिद्धतेची झलकही होती. सरदार साहेबांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे आणि विशेष टपाल तिकिटदेखील जारी केले गेले आहे. मी सर्व 140 कोटी देशवासियांना सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले
October 31st, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. सरदार पटेल यांची 150 वी जयंती हा ऐतिहासिक सोहळा असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एकता नगरमधील सकाळ दिव्य असून इथले विहंगम दृश्य विस्मयकारक असल्याचे सांगून मोदी यांनी सरदार पटेल यांच्या चरणी सामूहिक उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आणि देश आज एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचे सांगितले. त्यांनी देशव्यापी एकता दौड आणि कोट्यवधी भारतीयांच्या उत्साहपूर्ण सहभागाचा उल्लेख केला, आणि नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचे अधोरेखित केले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि आदल्या संध्याकाळी झालेल्या उल्लेखनीय सादरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की यामधून भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील श्रम आणि शौर्य तसेच भविष्यातील कामगिरीची झलक प्रतिबिंबित होत आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मृती प्रीत्यर्थ एक नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:09 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
October 17th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेच्या प्रारंभ प्रसंगी तसेच नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणीप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 11th, 12:30 pm
व्यासपीठावर विराजमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले राजीव रंजन सिंह जी, श्रीमान भागीरथ चौधरी जी, विभिन्न राज्यांचे मुख्यमंत्री, संसद सदस्य, आमदार, इतर महानुभाव आणि देशभरातून या कार्यक्रमात जोडले गेलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो!!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात
October 11th, 12:00 pm
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रातील 35,440 कोटी रुपये खर्चाच्या दोन महत्त्वाच्या योजनांचा प्रारंभ केला.यावेळी त्यांनी 24,000 कोटी रुपये खर्चाची पंतप्रधान धनधान्य कृषी योजना सुरु केली. तसेच त्यांनी 11,440 कोटी रुपये खर्चाचे डाळींच्या क्षेत्रातील आत्मनिर्भरता अभियान देखील सुरु केले. पंतप्रधानांनी कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न प्रक्रिया या क्षेत्रांतील 5,450 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करून त्यांचे लोकार्पण देखील केले आणि सुमारे 815 कोटी रुपये खर्चाच्या अतिरिक्त प्रकल्पांची पायाभरणी केली.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 08th, 10:15 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 ला केले संबोधित
October 08th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार,माध्यम आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025 च्या 9 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. इंडिया मोबाइल काँग्रेसच्या या विशेष आवृत्तीत आर्थिक फसवणूक प्रतिबंध, क्वांटम कम्युनिकेशन, 6जी, ऑप्टिकल कम्युनिकेशन आणि सेमीकंडक्टर्स यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर असंख्य स्टार्टअप्सनी सादरीकरणे केली आहेत, असे सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी म्हणाले. अशा महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरणे पाहिल्यानंतर भारताचे तांत्रिक भविष्य सक्षम हातात आहे हा विश्वास दृढ होतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी या कार्यक्रमासाठी आणि सर्व नवीन उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.An RSS shakha is a ground of inspiration, where the journey from 'me' to 'we' begins: PM Modi
October 01st, 10:45 am
In his address at the centenary celebrations of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), PM Modi extended his best wishes to the countless swayamsevaks dedicated to the resolve of national service. He announced that, to commemorate the occasion, the GoI has released a special postage stamp and a coin. Highlighting the RSS’ five transformative resolutions, the PM remarked that in times of calamity, swayamsevaks are among the first responders.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले
October 01st, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, आणि आज महानवमी आणि देवी सिद्धिदात्रीचा दिवस असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, उद्या विजयादशमीचा भव्य उत्सव आहे. हा दिवस, अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अधःकारावर प्रकाशाचा विजय, हे भारतीय संस्कृतीचे कालातीत सत्य अधोरेखित करतो.नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 25th, 06:16 pm
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित
September 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.बिहारमधील पूर्णिया येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 15th, 04:30 pm
मी आपणा सर्वांना नमस्कार करतो.पूर्णिया माँ पूरण देवीचे भक्त प्रल्हाद, महर्षी मेंही बाबा यांचे हे कर्मस्थान आहे. या भूमीतच फणीश्वरनाथ रेणू, सतीनाथ भादुरी यांसारख्या कादंबरीकारांचा जन्म झाला आहे. विनोबा भावेंसारख्या कर्मयोगींची ही कर्मभूमी आहे. या भूमीला मी मनोमन नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु.40,000 कोटींच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 15th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु. 40,000 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वांना आदराने अभिवादन केले. पूर्णिया ही माँ पूर्ण देवी, भक्त प्रल्हाद आणि महर्षी मेही बाबा यांची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले. या मातीने फणीश्वरनाथ रेणू आणि सतीनाथ भादुरी यांसारख्या साहित्यिक दिग्गजांना जन्म दिला आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की, ही विनोबा भावे यांच्यासारख्या समर्पित कर्मयोग्यांची कर्मभूमी राहिली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या भूमीबद्दल आपला आदर व्यक्त केला.आसाममध्ये गोलाघाट येथील पॉलीप्रॉपिलीन प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 14th, 03:30 pm
आसामचे लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा जी, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल जी, हरदीपसिंह पुरी जी, आसाम सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या बंधू-भगिनींनो!