सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 13th, 06:55 pm

केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!

नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

February 13th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना अर्पण केली श्रद्धांजली

January 26th, 05:25 pm

प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना केले अभिवादन

January 26th, 03:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि हुतात्म्यांना अभिवादन केले.