लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

December 25th, 06:16 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन

December 25th, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार

December 24th, 11:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2025 रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करतील आणि यानिमित्त एका सार्वजनिक सभेला ते संबोधित करतील.