Uttar Pradesh is set to emerge as a major hub for the nation’s Semiconductor Ecosystem: PM Modi
February 21st, 05:30 pm
PM Modi participated in the groundbreaking ceremony of HCL-Foxconn Semiconductor Unit in Uttar Pradesh. Speaking via VC, he lauded the ceremony as a historic milestone in India’s journey toward becoming a global semiconductor hub. He remarked that India has accelerated its pace in 2026 and highlighted major milestones such as Viksit Bharat Young Leaders Dialogue, National Startup Day and India Energy Summit. The PM credited the Double-Engine Government for changing the identity of Uttar Pradesh.पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले सहभागी
February 21st, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर युनिटच्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने हा समारंभ म्हणजे जागतिक सेमीकंडक्टर हब बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे.राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर
February 05th, 05:35 pm
विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात मागील वर्ष जलद प्रगती आणि विकासाचे वर्ष राहिले आहे. हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी परिवर्तनाचा कालखंड राहिला आहे. देश योग्य दिशेने जलद गतीने पुढे जात आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अतिशय उत्तम पद्धतीने , अतिशय संवेदनशीलतेने हे विषय आपल्यासमोर मांडले आहेत .राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर
February 05th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त करणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की गेल्या वर्षभरात विकसित भारताच्या प्रवासात वेगाने प्रगती झाली आहे, प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या सर्व घटकांमध्ये परिवर्तन झालेले दिसून येत असून देश योग्य दिशेने वेगाने पुढे जात आहे. राष्ट्रपतींनी हे विषय अतिशय संवेदनशीलतेने आणि स्पष्टपणे मांडले आहेत असे मोदी यांनी अधोरेखित केले.‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
November 26th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 'सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच - निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 मेट्रिक टन (एमटीपीए) एकात्मिक रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट (आरईपीएम) उत्पादन क्षमता निर्माण करणे हे आहे. यामुळे भारताची आत्मनिर्भरता वाढवून जागतिक आरईपीएम बाजारपेठेत देशाला एक महत्त्वपूर्ण स्थान मिळेल.