पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

July 04th, 09:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पोर्ट ऑफ स्पेन येथे आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहीप यांनी ‘ वैष्णव जन तो’ हे गीत गायले होते.