पटना पक्षी अभयारण्य आणि छरी-धांड येथे नवीन रामसर स्थळांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

January 31st, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छारी-धंद यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले आहे. स्थानिक लोकसंख्या आणि पाणथळ जागांच्या संवर्धनाबद्दल आस्था असलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, या मान्यतांमुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

"भारताच्या पाणथळ संवर्धन मोहिमेतील मैलाचा दगड" या शब्दात पंतप्रधानांनी बिहारमधील नव्या रामसर स्थळांचा केला गौरव

September 27th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील दोन नव्या रामसर स्थळांचा समावेश ज्यात बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय (448 हेक्टर) आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील उदयपूर झील (319 हेक्टर) यांचा समावेश होतो, याला भारताच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी अभिमानाचा क्षण ठरवत गौरव केला.