म्हैसूर येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र – विवेक स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर
August 01st, 04:53 pm
सर्वप्रथम मी म्हैसूरच्या अधिष्ठात्री देवी माता चामुंडेश्वरी यांना साष्टांग प्रणाम करतो. अवघ्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आपण सर्व जाणता की, माझ्या जीवनप्रवासाची सुरुवात जिथून झाली आणि आज मी ज्या स्थानावर आहे, त्या प्रवासात रामकृष्ण मिशनचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. तीन महिन्यांपूर्वी मला हावडा येथील बेलूर मठाला भेट देण्याची संधी मिळाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे केले उद्घाटन
August 01st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या विशाल जनसमुदायाला अभिवादन करून पंतप्रधानांनी शहराची अधिष्ठात्री देवता असलेल्या देवी चामुंडेश्वरीला आदराने वंदन केले.India and Indonesia are connected not only by our history but also by a shared future: PM Modi at community programme in Jakarta
July 07th, 11:47 pm
Addressing the Indian community in Jakarta, PM Modi thanked the diaspora for their warm welcome and praised their contribution to Indonesia's progress and their role as a living bridge between the two nations. He spoke about India's rapid transformation and called upon the community to contribute towards the shared aspirations of Viksit Bharat 2047 and Indonesia Emas 2045.पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित
July 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतस्वदेशी उत्पादने, व्होकल फॉर लोकल: सणांच्या हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे मन की बात मधून नागरिकांना आग्रहपूर्वक आवाहन
September 28th, 11:00 am
या महिन्याच्या मन की बातमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी भगतसिंग आणि लता मंगेशकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. भारतीय संस्कृती, महिला सक्षमीकरण, देशभरात साजरे होणारे विविध सण, रा,स्व, संघाचा 100 वर्षांचा प्रवास, स्वच्छता आणि खादी विक्रीतील वाढ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. स्वदेशीचा स्वीकार हाच देशाला स्वावलंबी बनवण्याचा मार्ग आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.फिजीच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
August 25th, 12:30 pm
त्यावेळी आम्ही फोरम फॉर इंडिया - पॅसिफिक आयलंड कोऑपरेशन (पॅसिफिक बेटांच्या सहकार्यासंबंधीचा भारतासाठी मंच) म्हणजे 'फिपिक'चा प्रारंभ केला. त्या पुढाकाराने केवळ भारत- फिजी संबंधच नव्हे, तर संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रासमवेत असलेल्या आमच्या संबंधांना नवीन ताकद प्राप्त झाली. आणि आज पंतप्रधान राबुका यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून या सहसंबंधांमध्ये नवा आयाम जोडला जातो आहे.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
August 05th, 11:06 am
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण - महाराडिया लावना - हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.पंतप्रधानांनी थाई सरकारद्वारे रामाकीन भित्तीचित्रांचे चित्रण दर्शवणाऱ्या आयस्टॅम्पचे अनावरण केले अधोरेखित
April 03rd, 09:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाकीन भित्तीचित्रांचे चित्रण असणाऱ्या थायलंड सरकारच्या आयस्टॅम्पच्या अनावरणाला अधोरेखित केले.थायलंडच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत केलेले निवेदन
April 03rd, 03:01 pm
पंतप्रधान शिनावात्रा यांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामध्ये बळी पडलेल्यांविषयी मी भारताच्या नागरिकांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो. यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही प्रार्थना देखील करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला थाई रामायण – रामाकियन च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलात्मक सादरीकरणाचा अनुभव
April 03rd, 01:02 pm
भारत आणि थायलंड यांच्यामधील गहिऱ्या सांस्कृतिक आणि नागरी समाजातील नातेसंबंधांबद्दलची आपल्या मनातली गौरवाची भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंड मधील बँकॉक इथे रामाकियन या थाई रामायणाच्या समृद्ध कलात्मक सादरीकरणा अनुभव घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
March 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -थायलंडमध्ये संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
February 14th, 08:30 am
थायलंडमधील संवादच्या या आवृत्तीत तुम्हा सर्वांसोबत सहभागी होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारत, जपान आणि थायलंडमधील अनेक प्रतिष्ठित संस्था आणि मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो आणि सर्व सहभागींना शुभेच्छा देतो.थायलंडमधील संवाद कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
February 14th, 08:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी थायलंडमधील संवादच्या कार्यक्रमाच्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबतचा सन्मान व्यक्त केला आणि हा कार्यक्रम साध्य केल्याबद्दल भारत, जपान आणि थायलंडमधील प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे कौतुक केले. त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.इंडोनेशिया, जकार्ता येथील श्री सनातन धर्म आलायम यांच्या महा कुंभाभिशेगम दरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 02nd, 02:45 pm
काहीच दिवसांपुर्वी 140 कोटी भारतीयांचे प्रेम सोबत घेऊन राष्ट्रपती प्रबोवो भारतातून परतले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रत्येक भारतीयाने दिलेल्या शुभेच्छा जाणवत असतील याची मला खात्री आहे.इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 02nd, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
January 25th, 01:00 pm
भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशिया आपला मुख्य अतिथी देश होता आणि आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, इंडोनेशिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग बनत आहे. या प्रसंगी मी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांचे भारतात हार्दिक स्वागत करतो.पंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी
October 11th, 12:39 pm
भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार