तामिळनाडूच्या मदुराई येथे विविध पायाभूत सुविधांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 03:30 pm

मी पवित्र आणि ऐतिहासिक शहर मदुराईमध्ये येऊन सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहे. मी मीनाक्षी अम्मन आणि भगवान सुंदरेश्वर यांना नमन करतो. आजचा कार्यक्रम तामिळनाडूच्या विकास यात्रेतील एका गौरवपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. आम्ही 4,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले आहेत. हे प्रकल्प संपर्कव्यवस्थेत बदल घडवून आणतील, अर्थव्यवस्थेला चालना देतील, रोजगार निर्माण करतील आणि लाखो लोकांचे जीवन बदलून टाकतील. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळेल आणि तीर्थयात्री व पर्यटकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच व्यवसायांसाठी जलद वाहतुकीची सोय होईल. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे लोकांना सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण तसेच भूमिपूजन

March 01st, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई येथे रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पवित्र मदुराई नगरीत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस तामिळनाडूच्या विकास प्रवासातील अभिमानास्पद अध्याय आहे. हे प्रकल्प संपर्क व्यवस्थेचा आमूलाग्र बदल, अर्थव्यवस्थेला चालना आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासोबतच राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवतील.

तामिळनाडूमध्ये 1853 कोटी रुपये खर्चासह 4-पदरी परमकुडी–रामनाथपुरम् (एनएच-87) खंडाच्या बांधकामास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

July 01st, 03:13 pm

केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूमध्ये 4 -पदरी परमकुडी ते रामनाथपुरम् (एनएच-87) खंडाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे 46.7 किलोमीटर लांबीचा हा मार्ग हायब्रिड अ‍ॅन्युइटी मोड वर विकसित केला जाणार असून त्यासाठी एकूण 1,853 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

डॉ. कलम यांनी भारतातल्या युवावर्गाला प्रेरणा दिली: पंतप्रधान मोदी

July 27th, 12:34 pm

सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना मनःपूर्वक श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की रामेश्वरमचा साधेपणा, शांतपणा आणि सखोलता कलम यांच्या वागण्यात पूर्णपणे दिसत असे. श्री मोदी यांनी कलम यांचे युववार्गाशी असणाऱ्या नात्याचा उल्लेख करून म्हटले की डॉ. कलाम यांनी भारतातल्या युवावर्गाला प्रेरणा दिली आहे. मला माहिती आहे की आजच्या युवावर्गाला नवीन उंची गाठायची आहे आणि त्यांना रोजगार निर्माता व्हायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरममधील पी करुंबू येथील डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम स्मारकाचे उद्‌घाटन

July 27th, 12:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामेश्वरम इथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी ‘कलाम संदेश वाहिनी’ या प्रदर्शन बसला हिरवा झेंडा दाखवला; ही बस देशातल्या विविध राज्यात प्रवास करेल. त्यांनी नील क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप केले, नवीन अयोध्या-रामेश्वरम एक्सप्रेस गाडीचा त्यांनी शुभारंभ केला आणि ‘हरित रामेश्वरम प्रकल्पाची’ रूपरेषा प्रकाशित केली.