TMC came to power by lying in the name of “Maa, Maati, Manush”: PM Modi in Dakshin Dinajpur, West Bengal

April 11th, 11:40 am

PM Modi addressed a massive rally Dakshin Dinajpur, West Bengal. In his speech, he prioritised women’s safety, justice, and empowerment, outlining measures like fast-tracking cases, increasing women police recruitment, and financial support initiatives. He remarked that while the BJP believes in Sabka Saath, Sabka Vikas, it will also ensure that ‘hisaab’ is fulfilled in West Bengal.

The BJP’s resolve is a declaration to end TMC’s jungle raj and syndicate rule: PM Modi in Jangipur, West Bengal

April 11th, 11:38 am

PM Modi addressed a massive rally in Jangipur, West Bengal. In his speech, he lauded BJP’s manifesto, outlining six key guarantees focused on ending syndicate raj, ensuring women’s empowerment, boosting education infrastructure, and delivering transparent governance. He also promised employment opportunities and benefits for government employees.

Massive public meetings in Purba Bardhaman, Jangipur & Dakshin Dinajpur, West Bengal

April 11th, 11:30 am

Tapping into the growing momentum in West Bengal, PM Modi addressed a massive public gathering in Purba Bardhaman, highlighting BJP’s vision for a fear-free, Viksit Bengal while launching a sharp attack on the TMC government over corruption, lawlessness and appeasement politics.

रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

March 26th, 12:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याग, तपस्या आणि आत्मसंयम या वैशिष्ट्यांचे प्रतिक असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांचे जीवन प्रत्येक परिस्थितीचा सामर्थ्याने आणि निर्धाराने सामना करण्यासाठी लोकांना प्रेरणा देत आले आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 06th, 02:00 pm

तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

April 06th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

April 06th, 08:28 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान तामिळनाडूला भेट देणार, रामेश्वरम द्विप मुख्य भूमीला जोडणाऱ्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उदघाटन करणार

April 04th, 02:35 pm

राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 एप्रिल रोजी तामिळनाडूला भेट देणार आहेत. ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास नव्या पंबन रेल्वे पूल - भारताच्या पहिल्या उर्ध्व समुद्री पुलाचे उद्घाटन करतील आणि महामार्गाच्या पुलावरून रेल्वे तसंच जहाजाला हिरवा ध्वज दाखवतील आणि पुलाच्या परीचालनाचे साक्षीदार ठरतील.

छत्तीसगडमधील बिलासपूर येथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 30th, 06:12 pm

छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका, इथले लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री विष्णुदेव साय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल, या मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रातील मंत्री तोखन साहू, छत्तीसगड विधानसभेचे सभापती आणि माझे परम मित्र रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, अरूण साहू, छत्तीसगड सरकारमधील सर्व मंत्री, इथले सर्व खासदार आणि आमदार तसेच दूर -दूरवरून इथे आलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथे 33,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन

March 30th, 03:30 pm

पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत उपजीविका वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील बिलासपूर येथे 33,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, सोबतच अनेक प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ केला तर काही उपक्रम राष्ट्राला समर्पित केले. आजपासून सुरू होणारे नवीन वर्ष आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी माता महामायेची भूमी आणि माता कौशल्येचे माहेर असलेल्या छत्तीसगडचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्री देवततांना समर्पित या नऊ दिवसांचे छत्तीसगडसाठी विशेष महत्त्व पंतप्रधानांनी सांगितले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी छत्तीसगडमध्ये येण्याचा आपल्याला अभिमान आहे असे ते म्हणाले. भक्त शिरोमणी माता कर्मा यांच्या सन्मानार्थ अलिकडेच जारी करण्यात आलेल्या टपाल तिकिटाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. नवरात्रोत्सवाची सांगता रामनवमी साजरी करून होईल असे ते म्हणाले. रामनवमीचे पर्व छत्तीसगडमधील लोकांची भगवान रामावरील अद्वितीय भक्ती, विशेषतः ज्यांनी आपले संपूर्ण अस्तित्व भगवान रामाच्या नावाला समर्पित केले आहे अशा रामनामी समाजाच्या असाधारण समर्पणावर प्रकाश टाकणारे आहे असे ते म्हणाले. त्यांनी छत्तीसगडच्या लोकांना भगवान रामांच्या आजोळचा परिवार म्हणून संबोधित केले आणि त्यांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

पंजाबमधील गुरुदासपूर आणि जालंधर येथे पंतप्रधान मोदींच्या विराट प्रचार सभा

May 24th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये गुरदासपूर आणि जालंधर येथे अत्यंत चैतन्याने भरलेल्या सभांना संबोधित करताना पवित्र भूमीला अभिवादन करून पंजाब आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात विशेष नाते असल्याचे दाखवून दिले.

When world was making big strides, Congress was creating records of scams: PM Modi in Jhargram, WB

May 20th, 03:15 pm

Lok Sabha election 2024 campaigning gathers pace as PM Modi, the NDA's star campaigner, intensifies efforts ahead of the 5th phase. Today, Prime Minister Narendra Modi addressed a euphoric crowd in Jhargram, West Bengal, delivering a message that resonated all the way to Tamluk. He promised to improve the state's declining situation through his tireless efforts.

पश्चिम बंगालमधील झारग्राम येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी गर्दीचे मन जिंकले

May 20th, 03:00 pm

NDA चे स्टार प्रचारक पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतल्याने लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचाराला वेग आला आहे. पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे आज उत्साही जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामलूकपर्यंत याचा संदेश पोहचवला गेला असल्याचे म्हटले. आपल्या अथक परिश्रमाने राज्यातील ढासळलेली परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टीएमसीच्या लांगूलचालनामुळे बंगालमध्ये डेमोग्राफी विस्कळीत झाली आहे: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालच्या मेदिनीपूरमध्ये

May 19th, 01:40 pm

पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथे आपल्या तिसऱ्या जाहीर सभेत बोलताना पीएम मोदींनी टीएमसीच्या कृतींचा निषेध करत हा पक्ष भ्रष्टाचार, दहशतवाद आणि लांगूलचालन करत असल्याचा आरोप केला, ते म्हणाले, बंगालमध्ये टीएमसी म्हणजे दहशत, भ्रष्टाचार आणि लांगूूलचालन हे समीकरण झाले आहे. आपल्या व्होट बँकेला खूष ठेवण्यासाठी, ते सतत हिंदू समाजाचा अपमान करत असतात. साधु-संन्याशांनी टीएमसी नेत्यांनी या राजकारणात पडू नये असा सल्ला दिला आहे.त्यावर प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी संन्यासी वर्गाबद्दल अवमानकारक उद्गार काढून इस्कॉन, रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रमावर अश्लाघ्य आरोप केले

टीएमसी असो वा काँग्रेस, ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया येथे

May 19th, 01:00 pm

पुरुलिया, पश्चिम बंगाल येथे आयोजित तुफानी प्रचार सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल श्रोतृवर्गाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती असलेली भाजपची वचनबद्धता या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत, टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.

पश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण

May 19th, 12:45 pm

पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.

जर तुम्ही 10 तास काम केले तर मी 18 तास काम करेन आणि ही मोदींची 140 कोटी भारतीयांना गॅरंटी आहे : पंतप्रधान मोदी प्रतापगढ येथे

May 16th, 11:28 am

उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील सभेत पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच्या INDI आघाडीच्या कारभारावर टीका करत त्यांचे अनेक गोष्टींतील अपयश अधोरेखित केले. आपल्या सरकारने जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवून भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात साध्य केलेले यश स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस आणि सपा यांच्या विकासाबाबतच्या उदासीन वृत्तीवर टीका केली, मेहनत न करता प्रगती होते या त्यांच्या मतावर त्यांनी उपरोधिकपणे टीका केली. ते पुढे म्हणाले, देशाचा आपसूकच विकास होईल, त्यासाठी कष्ट करण्याची काय गरज आहे?, असे सपा आणि काँग्रेसला वाटते, सपा आणि काँग्रेसच्या मानसिकतेचे दोन पैलू आहेत, हे आपसूकच होत राहील आणि याचा उपयोग काय? असे ते म्हणतात

भदोहीमध्ये काँग्रेस-सपा विजयी होण्याची सुतराम शक्यता नाही: पंतप्रधान मोदी यूपीच्या भदोही येथील सभेत

May 16th, 11:14 am

उत्तर प्रदेशातील भदोही येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, भदोहीमधील निवडणुकीची आज राज्यभर चर्चा होत आहे. लोक विचारत आहेत की, भदोहीमध्ये ही टीएमसी अचानक कुठून आली? याआधी यूपीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नव्हते, आणि या निवडणुकीत आपल्यासाठी काहीच आशा उरलेली नाही हे सपाने देखील मान्य केले आहे, म्हणूनच त्यांनी भदोहीच्या रिंगणातून पळ काढला आहे , भदोहीमध्ये सपा आणि काँग्रेसला आपली अनामत रक्कम वाचवणे देखील कठीण झाले, म्हणून ते भदोहीमध्ये हा राजकीय प्रयोग करत आहेत.

उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा

May 16th, 11:00 am

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .

We will make East India the growth engine of Viksit Bharat: PM Modi in Barrackpore

May 12th, 11:40 am

Today, in anticipation of the 2024 Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi sparked enthusiasm and excitement among the audience with his speech in Barrackpore, West Bengal. Expressing gratitude to the numerous mothers and sisters in attendance, he remarked, This scene indicates a forthcoming change in Bengal. The victory of 2019 is poised to be even greater for the BJP this time around.