भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर
November 11th, 12:00 pm
भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 11th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.बिहारमधील बख्तियारपूर-राजगीर-तिलैया एकेरी रेल्वे मार्गाच्या (104 किमी) 2,192 कोटी रुपये खर्चाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता
September 24th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने बिहारमधील बख्तियारपूर-राजगीर-तिलैया एकेरी रेल्वे मार्गाच्या (104 किमी) दुपदरीकरणाला मान्यता दिली आहे, ज्याचा एकूण खर्च सुमारे 2,192 कोटी रुपये आहे.बिहारमधील पूर्णिया येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 15th, 04:30 pm
मी आपणा सर्वांना नमस्कार करतो.पूर्णिया माँ पूरण देवीचे भक्त प्रल्हाद, महर्षी मेंही बाबा यांचे हे कर्मस्थान आहे. या भूमीतच फणीश्वरनाथ रेणू, सतीनाथ भादुरी यांसारख्या कादंबरीकारांचा जन्म झाला आहे. विनोबा भावेंसारख्या कर्मयोगींची ही कर्मभूमी आहे. या भूमीला मी मनोमन नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु.40,000 कोटींच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 15th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु. 40,000 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वांना आदराने अभिवादन केले. पूर्णिया ही माँ पूर्ण देवी, भक्त प्रल्हाद आणि महर्षी मेही बाबा यांची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले. या मातीने फणीश्वरनाथ रेणू आणि सतीनाथ भादुरी यांसारख्या साहित्यिक दिग्गजांना जन्म दिला आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की, ही विनोबा भावे यांच्यासारख्या समर्पित कर्मयोग्यांची कर्मभूमी राहिली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या भूमीबद्दल आपला आदर व्यक्त केला.आशिया करंडक 2025 च्या विजेत्या पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 08th, 07:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगिर इथे पार पडलेल्या आशिया करंडक 2025 स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. “गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत करत मिळविलेला हा विजय खूपच खास आहे”, असे मोदी म्हणाले.राष्ट्रीय क्रीडा दिनी बिहारमधील राजगीर इथे सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी आशिया चषक 2025 या स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
August 28th, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी आशिया कप 2025 मध्ये सहभागी झालेल्या आशियातील सर्व संघांना, खेळाडूंना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमधील राजगीर या ऐतिहासिक शहरात उद्या 29 ऑगस्ट रोजी या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचेही कौतुक केले आहे. बिहार हे अलिकडच्या काळात एक बहुआयामी क्रीडा केंद्र म्हणून उदयाला आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारने खेलो इंडिया युथ गेम्स 2025, 20 वर्षांखालील आशिया रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धा 2025, आंतरराष्ट्रीय सेपाकटकरॉ महासंघाची (ISTAF - International Sepaktakraw Federation) सेपाकटकरॉ विश्वचषक स्पर्धा 2024 आणि महिला आशियाई अजिंक्यपद चषक 2024 यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.बिहारमधील राजगीर येथील नालंदा विद्यापीठ परिसराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
June 19th, 10:31 am
कार्यक्रमाला उपस्थित बिहारचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी, कष्टाळू मुख्यमंत्री श्री नितीश कुमार जी, आमचे परराष्ट्र मंत्री श्री एस जयशंकर जी, परराष्ट्र राज्यमंत्री श्री पवित्र जी, विविध देशांचे मान्यवर, राजदूत, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु, प्राध्यापक, विद्यार्थी आणि उपस्थित मित्रांनो!पंतप्रधानांनी केले बिहारमध्ये राजगीर येथे नालंदा विद्यापीठ संकुलाचे उद्घाटन
June 19th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. 17 देशांच्या मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एक रोपटेही लावण्यात आले.