राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
December 02nd, 04:44 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 03rd, 05:15 pm
राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख
November 02nd, 10:17 pm
राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातमध्ये अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
October 27th, 12:42 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.राजस्थानात जैसलमेर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
October 14th, 10:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जैसलमेर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील केली आहे.Talking to you felt like talking to a family member, not the Prime Minister: Farmers say to PM Modi
October 12th, 06:45 pm
During the interaction with farmers at a Krishi programme in New Delhi, PM Modi enquired about their farming practices. Several farmer welfare initiatives like Government e-Marketplace (GeM) portal, PM-Kisan Samman Nidhi, Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, and PM Dhan Dhaanya Krishi Yojana were discussed. Farmers thanked the Prime Minister for these initiatives and expressed their happiness.35,440 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या कृषी योजनांच्या शुभारंभाच्या प्रसंगी कृषी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला
October 12th, 06:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ केला, ज्यासाठी एकूण 35,440 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पी एम धन धान्य कृषी योजना 24,000 कोटींच्या तरतुदीसह सुरू करण्यात आली, तर डाळींच्या आत्मनिर्भरतेसाठी मोहीम सुरु करण्यात अली असून, त्यासाठी 11,440 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील जयपूर इथल्या रुग्णालयात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला
October 06th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील जयपूर इथल्या रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 25th, 06:16 pm
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित
September 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.राजस्थानमधील बांसवाडा येथे विकासकामांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
September 25th, 02:32 pm
आपणा सर्वांना जय गुरु! राम-राम! राज्यपाल श्रीमान हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधराराजे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, आमच्यासोबत जोधपूरहून उपस्थित असणारे बंधू गजेंद्र सिंह शेखावत जी आणि अश्विनी वैष्णव जी, बीकानेरहून आमच्या सोबत असणारे अर्जुन राम मेघवाल जी, येथे उपस्थित उप मुख्यमंत्री प्रेम चंद बैरवा जी, दिया कुमारी जी, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मदन राठौड़ जी, राजस्थान सरकार मधले मंत्री, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील बंसवाडा येथे 1,22,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
September 25th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बंसवाडा येथे 1,22,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी बंसवाडा येथील त्रिपुरा सुंदरी मातेच्या पवित्र भूमीला भेट देण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे ते यावेळी म्हणाले. कंथाल आणि वागदची गंगा म्हणून पूजनीय असलेल्या माँ माहीचे दर्शन घेण्याची संधी आपल्याला मिळाली, असे त्यांनी सांगितले. माहीचे पाणी भारतातील आदिवासी समुदायांच्या लवचिकतेचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी महायोगी गोविंद गुरुजी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर प्रकाश टाकला, ज्यांचा वारसा आजही प्रतिध्वनित होत आहे, आणि माहीचे पवित्र पाणी त्या महान गाथेची साक्ष देत आहे. मोदी यांनी माता त्रिपुरा सुंदरी आणि माता माही यांना आदरांजली वाहिली आणि भक्ती आणि शौर्याच्या भूमीतून महाराणा प्रताप आणि राजा बन्सिया भिल यांच्या प्रति आदर भाव व्यक्त केला.25 सप्टेंबर रोजी पंतप्रधान उत्तर प्रदेश आणि राजस्थानला भेट देणार
September 24th, 06:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानला भेट देतील. सकाळी 9.30 वाजता ते ग्रेटर नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025 चे उद्घाटन करतील आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील.राजस्थानच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
September 08th, 02:11 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Cabinet approves development of Green Field Airport at Kota-Bundi (Rajasthan) at an estimated cost of Rs.1507.00 Crore
August 19th, 03:13 pm
The Cabinet Committee on Economic Affairs chaired by PM Modi has approved the development of Green Field Airport at Kota-Bundi in Rajasthan worth Rs.1507.00 Crore. The project aimed at addressing the anticipated traffic growth in the region includes construction of a Terminal Building spanning an area of 20,000 sqm capable of handling 1000 Peak Hour Passengers (PHP).राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले
August 13th, 05:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
July 29th, 12:14 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.राजस्थानमधील झालावाड इथल्या शाळेत झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
July 25th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील झालावाड इथल्या एका शाळेत झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी आपल्या सहवेदना बाधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम
June 04th, 01:20 pm
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून 2025 रोजी सकाळी 10:15 वाजता नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी पार्क येथे एका विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये पर्यावरणीय देखभाल आणि हरित गतिशीलतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
May 25th, 11:30 am
आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'