मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
May 01st, 03:35 pm
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन
May 01st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 29th, 11:30 am
मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाहिली आदरांजली
December 14th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान चित्रकर्मी राज कपूर यांना आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिली. राज कपूर हे दूरदृष्टी लाभलेले चित्रपट निर्माते, अभिनेते आणि महान शोमॅन होते, असे त्यांनी म्हटले आहे. राज कपूर हे केवळ चित्रपटनिर्माते नव्हते तर भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे एक सांस्कृतिक राजदूत होते, चित्रपटनिर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील पुढील अनेक पिढ्या त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूर यांना 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कपूर कुटुंबासोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद
December 11th, 09:00 pm
गेल्या आठवड्यापासून, आमच्या कुटुंबाचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तिथे आम्ही तुम्हाला प्राइम मिनिस्टर जी, पंतप्रधान जी कसे म्हणायचे ते ठरवत होतो! रीमा आत्या मला रोज फोन करून विचारत होती, मी असं म्हणू शकते का, मी तसं म्हणू शकते का?महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबाशी साधला संवाद
December 11th, 08:47 pm
महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हृदयस्पर्शी संवाद साधला. या विशेष मुलाखतीत राज कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान आणि त्यांच्या चिरस्थायी वारशाचा गौरव करण्यात आला. कपूर कुटुंबीयांशी पंतप्रधानांनी दिलखुलास संवाद साधला.