Prime Minister greets all CRPF personnel on their Raising Day

July 27th, 02:13 pm

Prime Minister Shri Narendra Modi today extended his greetings to all CRPF personnel on their Raising Day. He stated that the CRPF has distinguished itself through its unwavering courage and commitment to duty.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी त्यांना दिल्या शुभेच्छा

March 10th, 10:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दृढनिश्चय, कठोर शिस्त आणि समर्पणासाठी ओळखले जाणारे, सीआयएसएफ देशभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्तव्याप्रती असलेली त्यांची अढळ वचनबद्धता भारताच्या सुरक्षिततेत आणि प्रगतीत मोठे योगदान देते, असे मोदी यांनी म्हटले आहे .

भारतीय तट रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

February 01st, 11:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तट रक्षक दलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की भारतीय तट रक्षक दलाने आपल्या किनाऱ्यांवर ढालीप्रमाणे स्वतःला उभे करून आपली ओळख निर्माण केली. सागरी सुरक्षेप्रती दलाची अढळ प्रतिबद्धता, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद आणि सागरी परिसंस्थेच्या संरक्षणासाठी केलेले कार्य प्रशंसनीय आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांचे दलाच्या शूर कर्मचाऱ्यांना अभिवादन

January 19th, 09:30 am

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा आज स्थापना दिन असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दलाच्या शूर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करताना त्यांचे धाडस, समर्पण आणि निस्वार्थ सेवेची प्रशंसा करत त्यांना अभिवादन केले आहे.

सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या जवानांना शुभेच्छा

December 20th, 11:29 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सीमा बलाच्या स्थापना दिनानिमित्त संस्थेशी संबंधित सर्व जवानांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी बीएसएफ स्थापना दिनानिमित्त सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या

December 01st, 06:18 pm

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की बीएसएफ हे भारताच्या अविचल निर्धाराचे आणि पराकोटीच्या व्यावसायिकतेचे प्रतीक आहे. “बीएसएफचे जवान अत्यंत आव्हानात्मक प्रदेशांमध्ये सेवा बजावतात. त्यांच्या धैर्यासोबतच त्यांची मानवतावादी भावना देखील विलक्षण आहे,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा

July 27th, 09:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कर्तव्यनिष्ठा, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

सीआयएसएफच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी सीआयएसएफ जवानांना दिल्या शुभेच्छा

March 10th, 06:55 pm

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व सीआयएसएफ जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सीआयएसएफ हे दल व्यावसायिकता, समर्पणवृत्ती आणि शौर्यासाठी नावाजले जाते असे ते म्हणाले. अत्यावश्यक पायाभूत सुविधांचे संरक्षण तसेच दररोज असंख्य लोकांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करत हे जवान आपल्या सुरक्षा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावतात.कर्तव्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी खरोखरीच प्रशंसनीय आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांकडून दलाच्या उल्लेखनीय सेवेची प्रशंसा

February 01st, 09:30 am

भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या विशाल किनारपट्टीच्या रक्षणासाठी दलाकडून अथकपणे बाळगण्यात येणाऱ्या सतर्कतेचे कौतुक केले आहे. सागरी सीमांच्या रक्षणापासून ते आपत्तीला प्रतिसादापर्यंत, तस्करी प्रतिबंधापासून ते पर्यावरणाच्या रक्षणापर्यंत प्रत्येक बाबतीत भारतीय तटरक्षक दल आपल्या किनारपट्टीचे भक्कमपणे रक्षण करून आपल्या सागरी प्रदेशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची खबरदारी घेत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी या दलाच्या शूर जवानांना केला सलाम

January 19th, 05:18 pm

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या शूर जवानांचे धाडस, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाला स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा

December 01st, 08:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमा सुरक्षा दलाला, दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘बीएसएफ’च्या धैर्य, समर्पण व अपवादात्मक सेवेची त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी सीआरपीएफ वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

July 27th, 10:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीफच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांची अविचल समर्पित वृत्ती आणि देशाची ते करत असलेली अथक सेवा खरोखरीच प्रशंसनीय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 01st, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त, सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बीएसएफ स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

December 01st, 10:16 am

“बीएसएफच्या स्थापना दिनी,आपण या उत्कृष्ट दलाची प्रशंसा करतो, ज्यांनी आपल्या सीमांचे संरक्षक म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे शौर्य आणि अविचल निष्ठा त्यांच्या समर्पणाचा दाखला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यातल्या बीएसएफच्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे.”

भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या अदम्य साहस आणि शौर्याला पंतप्रधानांनी केला सलाम

October 24th, 08:58 am

भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एनएसजी जवानांना दिल्या शुभेच्छा

October 16th, 03:47 pm

या निमित्ताने पंतप्रधानांनी या दलातील सर्व धाडसी जवानांचे कौतुक केले ज्यांनी कर्तव्यपालनादरम्यान अतुट व्यावसायिकता, राष्ट्राप्रती अथांग प्रेम आणि अदम्य धैर्य दाखवले.

पंतप्रधानांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त जवानांना दिल्या शुभेच्छा

July 27th, 06:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शूर सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सीआरपीएफच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी त्यांची निस्सीम बांधिलकी खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले.

सीमा रस्ते संघटनेच्या 64 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत त्यांच्या प्रकल्प दंतक या उपक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा

May 05th, 10:41 am

सीमा रस्ते संघटनेच्या 64 व्या स्थापना दिनानिमित्त त्यांच्या प्रकल्प दंतक या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

प्रथमच दिल्लीबाहेर स्थापना दिन संचलनाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली सीआयएसएफची प्रशंसा

March 13th, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रथमच दिल्लीबाहेर आपले स्थापना दिवस संचलन आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 01st, 09:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.