Prime Minister Narendra Modi to visit West Bengal

March 12th, 05:30 pm

PM Modi will visit West Bengal on 14 March 2026. During the visit, the PM will launch development projects worth around Rs. 18,680 crores in Kolkata. These projects span multiple sectors, including road infrastructure, railways, port and shipping. This reflect the Government’s continued commitment to strengthening infrastructure, enhancing connectivity and accelerating economic growth in West Bengal and eastern India.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त’ या विषयावरच्या वेबिनारमध्ये केलेले संबोधन

February 27th, 01:01 pm

या वर्षातील पहिल्या बजेट वेबिनारमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत 'बजेट वेबिनार' ही एक भक्कम परंपरा बनली आहे. बऱ्याचदा अर्थसंकल्पाचे मूल्यमापन वेगवेगळ्या निकषांवर केले जाते; कधी शेअर बाजाराच्या चढउतारांवर चर्चा होते, तर कधी प्राप्तिकराच्या प्रस्तावांवर लक्ष केंद्रित केले जाते. पण वस्तुस्थिती ही आहे की, राष्ट्रीय अर्थसंकल्प हा कोणताही अल्पकालीन दस्तऐवज नसून तो एक धोरणात्मक आराखडा असतो. म्हणूनच अर्थसंकल्पाच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन देखील ठोस निकषांवर व्हायला हवे. अशी धोरणे जी पायाभूत सुविधांचा विस्तार करतील, जी पतपुरवठा सुलभ करतील, जी व्यापार सुलभता वाढवतील, जी प्रशासनात पारदर्शकता आणतील आणि सामान्य जनतेचे जीवन सुसह्य करून त्यांच्यासाठी नवनवीन संधी निर्माण करतील. अर्थसंकल्पातील या बाबींशी संबंधित निर्णयच अर्थव्यवस्थेला शाश्वत मजबुती देतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "विकसित भारतासाठी तंत्रज्ञान सुधारणा आणि वित्त" या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित

February 27th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पोत्तर वेबिनार 2026-27 मालिकेतील पहिल्या वेबिनारला आज संबोधित केले. या वेबिनारची संकल्पना 'विकसित भारतासाठी तंत्रज्ञान सुधारणा आणि वित्त' अशी होती. केंद्रीय अर्थसंकल्प हा अल्पकालीन दस्तऐवज नसून तो धोरणात्मक रोडमॅप आहे, यावर भर देऊन विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 16th, 03:00 pm

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,

आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण

October 16th, 02:30 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.

पंतप्रधान 25-26 ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर

August 24th, 01:08 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता ते अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर 5,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील. या वेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.

Today, with our efforts, we are taking forward the vision of a developed Tamil Nadu and a developed India: PM Modi in Thoothukudi

July 26th, 08:16 pm

PM Modi launched development projects worth ₹4,800 crore in Thoothukudi, spanning ports, railways, highways, and clean energy. He inaugurated the new ₹450 crore airport terminal, raising annual capacity from 3 to 20 lakh. Emphasising Tamil Nadu’s role in Make in India, he said the India–UK FTA will boost opportunities for youth, MSMEs, and strengthen regional growth.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूमधील तुतिकोरिन इथे 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण

July 26th, 07:47 pm

यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. चार दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर थेट भगवान रामेश्वराच्या पवित्र भूमीवर पोहोचणे, हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी परदेश दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराबद्दलही उपस्थितांना सांगितले. ही प्रगती भारताबद्दल वाढत असलेल्या जागतिक विश्वासार्हतेचे आणि राष्ट्राच्या नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. हाच आत्मविश्वास विकसित भारत आणि विकसित तामिळनाडूच्या निर्मितीला चालना देईल असे त्यांनी नमूद केले. आज भगवान रामेश्वर आणि भगवान तिरुचेंदूर मुरुगन यांच्या आशीर्वादाने तुतिकोरिनमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 2014 मध्ये तामिळनाडूला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम तुतिकोरिनमध्ये आजही सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती (PRAGATI) ची 48 वी बैठक संपन्न

June 25th, 09:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक येथे प्रगती (PRAGATI) ची 48 वी बैठक पार पडली. प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना अखंडपणे एकत्र आणून, सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीला चालना देण्यासाठीचे, आयसीटी-सक्षम, मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.

पंतप्रधानांनी भूषवले 46 व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद

April 30th, 08:41 pm

सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित प्रगती या केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या मल्टी- मोडल मंचाच्या 46 व्या बैठकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अध्यक्षस्थान भूषवले.

तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 06th, 02:00 pm

तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

April 06th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.

केंद्रीय मंत्रिमंडळाची पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज या 5.46 किमीच्या प्रकल्प विस्ताराला मंजुरी

August 16th, 09:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो च्या पीसीएमसी ते स्वारगेट या सध्याच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज अशा भूमिगत मार्ग प्रकल्प विस्ताराला मंजुरी दिली. या नवीन विस्तारित प्रकल्पाची Line-l B विस्तार अशी ओळख आहे आणि त्याचा विस्तार 5.46 किमी असेल. या विस्तारित प्रकल्पात तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल, जे मार्केट यार्ड, बिब्बेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज उपनगर यांसारख्या प्रमुख भागांना जोडेल.

BJP government is boosting tourism in Uttarakhand, creating new job opportunities: PM Modi at Rishikesh

April 11th, 12:45 pm

Ahead of the Lok Sabha Elections of 2024, Prime Minister Narendra Modi extended his heartfelt gratitude to all the people who gathered in the Rishikesh rally upon the PM’s arrival. The PM said, “You have come in such large numbers to bless us in Rishikesh, the gateway to Char Dham, situated in the proximity of Mother Ganga.” The PM discussed several key aspects related to Uttarakhand’s vision and the milestones achieved already.

PM Modi addresses an enthusiastic crowd at a public meeting in Rishikesh, Uttarakhand

April 11th, 12:00 pm

Ahead of the Lok Sabha Elections of 2024, Prime Minister Narendra Modi extended his heartfelt gratitude to all the people who gathered in the Rishikesh rally upon the PM’s arrival. The PM said, “You have come in such large numbers to bless us in Rishikesh, the gateway to Char Dham, situated in the proximity of Mother Ganga.” The PM discussed several key aspects related to Uttarakhand’s vision and the milestones achieved already.

विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल' कार्यक्रमात सिलीगुडी इथे पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 09th, 04:10 pm

नैसर्गिक सौंदर्य आणि चहासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर बंगालच्या या भूमीला भेट देताना मला खूप आनंद होत आहे. आज येथे हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. विकसित बंगालच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या विकासकामांसाठी मी बंगाल आणि उत्तर बंगालमधील जनतेचे अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला केले संबोधित

March 09th, 03:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे ‘विकसित भारत विकसित पश्चिम बंगाल’ कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये 4500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.

बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 02nd, 08:06 pm

बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी

March 02nd, 04:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी 'विकसित भारत विकसित छत्तीसगड' कार्यक्रमाला करणार संबोधित

February 22nd, 05:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित छत्तीसगड’ कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगडमधील 34,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी होणार आहे. हे सर्व प्रकल्प रस्ते, रेल्वे, कोळसा, ऊर्जा आणि सौर ऊर्जा आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्रांशी संबंधित आहेत.