India's Hydrogen Train stands as a remarkably successful testament to Make in India: PM Modi in Jind, Haryana

July 17th, 12:00 pm

PM Modi today launched various development projects in Jind, Haryana, spanning across sectors such as railways, highways, healthcare and cultural heritage. He also announced the launch of the country's first hydrogen-powered train. Celebrating the indigenous nature of this green mobility milestone, he emphasized that the entirely smoke-free train is a resounding, tangible triumph of the Make in India initiative. He noted that schemes like Khelo India and TOPS have benefited budding athletes.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

July 17th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी या प्रदेशाचा समृद्ध ऐतिहासिक, लढाऊ आणि आध्यात्मिक वारसा अधोरेखित केला; ज्याला 'शक्तीपीठ माता जयंती'चा विशेष आशीर्वाद लाभला आहे. अनेक दशकांपूर्वी संघटनात्मक कामांसाठी या शहराला दिलेल्या भेटींची आठवण सांगताना, त्यांनी तेथील लोकांकडून मिळालेल्या अविस्मरणीय प्रेमाचाही आवर्जून उल्लेख केला; तिथल्या 'मुर्रा' जातीच्या म्हशींचे दुग्धजन्य पदार्थ, 'देसी बुरा' आणि 'घेवर' यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांशी हे नाते घट्टपणे जोडलेले आहे. ही काही सामान्य भूमी नाही; तर इतिहास, शौर्य, धर्म आणि असीम अभिमानाची ही एक महान भूमी आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

The restoration of Bengal's glory has begun: PM Modi in Tarakeswar during Paschimbanga Divas

June 20th, 05:13 pm

At Paschimbanga Divas in Hooghly, PM Modi extended his greetings to the people and launched development projects across key sectors. He also released the 23rd PM-KISAN instalment worth over ₹18,880 crore for more than 9.44 crore farmers. He paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee and highlighted Eastern India’s development under Mission Purvodaya.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी

June 20th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत अधिकृत द्विपक्षीय चर्चा

June 14th, 08:37 pm

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या बाबतीत सर्वच पैलुंवर झालेली प्रगती आणि वाढलेल्या व्याप्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच संरक्षण विषयक मंच आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत संयुक्त डिझाईन, सह विकास, आणि सह उत्पादनावर भर देत हे सहकार्य अधिक वृद्धींगत करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील परस्पर सहकार्याचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. यासोबतच मानवी अंतराळ मोहीमा आणि अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता या क्षेत्रातील सहकार्य अधिक विस्तारण्याबाबतही चर्चा केली. अंतराळ क्षेत्राशी संबंधित खाजगी क्षेत्राच्या भागिदारीचा विस्तार करण्याच्या पर्यायांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात, भारताच्या शांती कायद्यामुळे लहान आणि प्रगत मॉड्युलर रिएक्टर्ससह सहकार्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या असल्याची दखलही दोन्ही नेत्यांनी घेतली.

Visit of Prime Minister to France and Slovakia (June 13-18, 2026)

June 09th, 07:20 pm

PM Modi will visit France from 13-14 June 2026 and again from 16-19 June 2026. During his initial visit to France, he will hold discussions with President Emmanuel Macron and jointly inaugurate the 'Bharat Innovates' event. He will then visit Slovakia from 14-16 June 2026 to hold discussions with PM Robert Fico and meet President Peter Pellegrini. The PM will once again visit France to participate in the G7 Summit and the VivaTech Summit.

हायब्रीड ॲन्युइटी मोड अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग-347B वरील हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी दरम्यानच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण तसेच देशगाव - जुलवानिया दरम्यानच्या 108.643 किलोमीटर रस्त्याच्ये 4 पदरी मार्गात रुंदीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 03rd, 03:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA - Cabinet Committee on Economic Affairs) आज मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-347B च्या अद्यवतीकरणाच्या कामांना मंजुरी दिली. या अंतर्गत हायब्रीड ॲन्युइटी मोडवर 4,415.60 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हिवरखेडी-रोशनी-आशापूर-रुधी टप्प्यातील सध्याच्या 125.01 किलोमीटर लांबीच्या मध्यवर्ती मार्गिकांचे महामार्गालगतची आपत्कालीन वापरातली मार्गिकांच्या (पेव्ह्ड शोल्डर) मानकांसह 2 पदरी मार्गातध्ये अद्ययावतीकरण केले जाईल. यासोबतच देशगाव-जुलवानिया टप्प्याअंतर्गत विद्यमान 2 पदरी रस्त्याचे 108.643 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी रस्त्यात रुंदीकरण केले जाईल.

पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार

May 09th, 11:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.

DMK’s policy is by the family, of the family and for the family: PM Modi in Coimbatore, Tamil Nadu

April 18th, 06:20 pm

Election, Coimbatore, Tamil Nadu, BJP, Lord Murugan, Puthandu, Nari Shakti Vandan Adhiniyam, Nari Shakti, Women Empowerment, Women's Reservation Bill, Parliament, Corruption, Highway, Roadways, Next Generation Infrastructure, Railway, Inclusive Growth, C. P. Radhakrishnan, Surya Ghar Muft Bijli Yojana, Rooftop Solar, Electricity for all, Investment, Jobs, Jal Jeevan Mission, MUDRA, Pradhan Mantri Ujjwala Yojana, Business, Income Tax, GST Bachat Utsav, Education, Healthcare, Ayushman Bharat Yojana, Jan Aushadhhi Kendra, Yuva Shakti, First Time Voters, Census, MSME, Economy, Natural Farming, Farmer Welfare, Innovation, Employment, Viksit Bharat Viksit Tamil Nadu,

PM Modi’s fiery speech electrifies Coimbatore

April 18th, 06:00 pm

Prime Minister Narendra Modi today delivered a high-energy and politically charged address in Coimbatore, Tamil Nadu, drawing an enthusiastic response from the public. Addressing a large gathering, Prime Minister Modi said the people of Tamil Nadu are sending a clear message ahead of the upcoming polls: “NDA is in, DMK is out.”

Gujarat’s biggest strength is that it has kept development moving continuously for the past 25 years: PM Modi in Vav-Tharad

March 31st, 05:00 pm

PM Modi launched and dedicated multiple development projects in Vav-Tharad, Gujarat, worth nearly ₹20,000 crore. Addressing a large gathering, he highlighted initiatives across roads, railways, power, water supply, urban development, healthcare and tourism aimed at boosting connectivity, improving public services and accelerating socio-economic growth in the region while strengthening the vision of a Viksit Bharat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वाव-थराद येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे केले भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण

March 31st, 04:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील वाव-थराद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी उत्तर गुजरातसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले; तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले. नवरात्रीचा पवित्र उत्सव नुकताच साजरा झाला असून, आज 'भगवान महावीर जयंती' देखील आहे, याची नोंद घेत पंतप्रधानांनी 'माँ अंबाजी' आणि 'भगवान श्री धरणीधरजी' यांना आदरांजली अर्पण केली.

पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे लोकसभेत निवेदन

March 23rd, 02:15 pm

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे भारतासमोर निर्माण झालेली आव्हाने यावर बोलण्यासाठी या प्रतिष्ठित सदनात मी उपस्थित आहे. सध्याची पश्चिम आशियाची परिस्थिती चिंताजनक आहे. मागच्या दोन -- तीन आठवड्यांमध्ये जयशंकर जी आणि हरदीप पुरी जी यांनी या विषयावर सदनाला आवश्यक ती माहिती दिली आहे. या संकटाला आता 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. याचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांच्या जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे म्हणूनच संपूर्ण जग, या संकटावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सर्व संबंधित पक्षांना आवाहन करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पश्चिम आशियातील संघर्षावर लोकसभेत निवेदन

March 23rd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर आणि त्यामुळे भारतासमोर उभ्या राहिलेल्या व्यापक आव्हानांवर आज लोकसभेत निवेदन केले. हे संकट आता तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू राहिले असून, त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि मानवी जीवनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहेत, असे नमूद करत पंतप्रधानांनी या समस्येच्या तातडीने निराकरणावर भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करताना मोदी म्हणाले, संपूर्ण जग सर्व पक्षांना हे संकट लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन करत आहे.

Today, Uttar Pradesh and the entire country are witnessing a new era of world-class infrastructure: PM Modi in Meerut

February 22nd, 01:30 pm

PM Modi inaugurated the Namo Bharat Rapid Rail and the Meerut Metro in Meerut, calling them a new surge of energy for a ‘Viksit Uttar Pradesh’ and a ‘Viksit Bharat’. He highlighted that the government conferred the Bharat Ratna upon Chaudhary Charan Singh ji and inspired by his vision, the double-engine government is working to increase farmers' income. He noted that a transformed Uttar Pradesh has triggered a major economic surge and manufacturing boom.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या 'नमो भारत' प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था (आर आर टी एस) चे केले उद्घाटन आणि दिल्ली-मीरत नमो भारत कॉरिडॉर राष्ट्राला केला समर्पित

February 22nd, 01:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीरत इथे 'नमो भारत रॅपिड रेल' या द्रुतगती रेल्वे सेवेचे आणि 'मीरत मेट्रो' मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी, ‘विकसित उत्तर प्रदेश’ आणि ‘विकसित भारत’ यासाठी एका नवीन ऊर्जेचा संचार असे केले. रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी एकाच फलाटावरून सुरू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीखाली प्रत्येकी 2 पदरी ट्विन ट्यूब टीबीएम (Twin Tube TBM - अत्याधुनिक यंत्राद्वारे खोदलेले दोन स्वतंत्र समांतर बोगदे) या पाण्याखालील रस्ते बोगद्याच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी, एका ट्यूबमध्ये रेल्वे पायाभूत सुविधांची तरतूद, प्रकल्पाची एकूण लांबी 33.7 किमी

February 14th, 12:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आसाममधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 15 वरील गोहपूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 715 वरील नुमालीगड या दरम्यान 4 पदरी प्रवेश नियंत्रित हरित संपर्क जोडणीविषयक बांधकामाला काल मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ब्रह्मपुत्रा नदीखाली 15.79 किमी लांबीच्या रस्ते आणि रेल्वे बोगद्याचा (Road cum Rail Tunnel) समावेश आहे. हा संपूर्ण प्रकल्प एकूण 18,662 कोटी रुपये भांडवली खर्चासह अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC - Engineering Procurement Construction) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे.

ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाचे इंग्रजी भाषांतर

February 13th, 08:30 pm

आपल्या सर्वांचे या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण येथे “ए डिकेड ऑफ डिसरप्शन, ए सेंच्युरी ऑफ चेंज” या विषयावर चर्चा करत आहोत. विनीतजींचे भाषण ऐकल्यानंतर मला वाटते की, माझे काम खूप सोपे झाले आहे. मात्र एक छोटीशी विनंती करतो, आपल्याला इतके सगळे माहीत आहे, तर कधीतरी इटी मध्येही ते दिसायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला केले संबोधित

February 13th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2026 ला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना, पंतप्रधानांनी जागतिक व्यापार शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत केले आणि 'संकटांचे दशक, बदलाचे शतक' या संकल्पनेवर आपले विचार मांडले. 21 व्या शतकातील गेल्या दशकात अभूतपूर्व संकटे आली, ज्यात जागतिक महामारी, वेगवेगळ्या भागांमध्ये तणाव आणि युद्धे आणि जागतिक संतुलन बिघडवणारे पुरवठा साखळीतील बिघाड यांचा समावेश आहे, यावर त्यांनी भर दिला. संकट काळातच देशाचे सामर्थ्य समोर येते असे सांगून या अडथळ्यांना न जुमानता, भारताचे दशक उल्लेखनीय विकास, उत्कृष्ट कामगिरी आणि लोकशाहीच्या बळकट करणारे ठरले याबद्दल अभिमान व्यक्त केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर

February 05th, 05:35 pm

विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात मागील वर्ष जलद प्रगती आणि विकासाचे वर्ष राहिले आहे. हा काळ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी परिवर्तनाचा कालखंड राहिला आहे. देश योग्य दिशेने जलद गतीने पुढे जात आहे. आदरणीय राष्ट्रपतींनी अतिशय उत्तम पद्धतीने , अतिशय संवेदनशीलतेने हे विषय आपल्यासमोर मांडले आहेत .