प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
April 26th, 08:34 pm
प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारताच्या विविधतेचे आणि जिवंतपणाचे आपल्या कॅमेऱ्यातून अमर चित्रण करणारे ते एक सर्जनशील कलावंत होते, असे पंतप्रधान म्हणाले. रघू राय यांच्या छायाचित्रांमध्ये विलक्षण संवेदनशीलता, सखोलता आणि विविधता दिसून येत होती. त्यांनी भारतातील जीवनाचे अनेक पैलू आपल्या कॅमेऱ्यात टिपत लोकांच्या जवळ आणले, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.