पंतप्रधानांनी इटलीच्या राष्ट्रपतींची घेतली भेट

May 20th, 07:19 pm

भारत-इटली संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती मॅटारेला यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी भारत-इटली सामरिक सहयोगाच्या वाढत्या प्रगतीची नोंद घेतली आणि व्यापार- गुंतवणूक, विज्ञान- तंत्रज्ञान, संशोधन - नवोपक्रम, संरक्षण -सुरक्षा, अवकाश, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध या क्षेत्रांत सुरू असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरही विचारांची देवाणघेवाण केली.