थायलंडच्या राजमाता महाराणी सिरिकीत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
October 26th, 03:39 pm
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी थायलंडच्या राजमाता, महाराणी सिरिकीत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोक संदेशात त्यांनी महाराणी सिरिकीत यांनी लोकसेवेत आयुष्यभर दिलेल्या योगदानाला आदरांजली वाहत नमूद केले की, त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.