
समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या प्रवासात आपण पुढे वाटचाल करत असताना क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक मोलाचा आहे - पंतप्रधान
January 16th, 06:00 pm
क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक क्रमवारीत कॅनडा आणि जर्मनी यांच्या पुढे जात भारताने दुसरे स्थान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “हे पाहून माझे ह्रदय आनंदाने भरुन गेले आहे! गेल्या दशकात युवा पिढीला स्वावलंबी होऊन अर्थार्जन करता यावे यासाठीचे कौशल्य शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे,” मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेने आपण पुढे मार्गक्रमण करत असताना क्यूएस जागतिक भविष्यवेधी कौशल्य निर्देशांक क्रमवारीतील हे स्थान महत्त्वाचे आहे.